"पोरींना कसं कॅमेऱ्यात दाखवतो, आम्हाला पण दाखव"; क्रिकेट मॅच सुरू असताना... | IPL Video comedy Video | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 IPL Video

"पोरींना कसं कॅमेऱ्यात दाखवतो, आम्हाला पण दाखव"; क्रिकेट मॅच सुरू असताना... | PL Video

Cricket News: दोनपेक्षा जास्त किंवा अनेक खोडकर मित्र सोबत असल्यावर ते मिळून काहीतरी मस्ती करत असतात. एखाद्याला मुद्दाम चिडवणे, डायलॉगबाजी करणे असे उद्योग काही तरूणांचे सुरू असतात.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट सामन्यात मुलांनी कॅमेरामनची फिरकी घेतली आहे.

सध्या महिला आयपीएलचे सामने सुरू आहेत. सामना बघायला गेलेल्या काही मराठी तरूणांचा हा व्हिडिओ आहे. सामन्यादरम्यान अनेकदा आपल्याला सुंदर मुली स्क्रीनवर दिसत असतात. पण तरूणांना सहसा स्क्रीनवर दाखवलं जात नाही.

प्रेक्षकांमध्ये असलेल्या तरूणांमधील एकाने कॅमेरामनला उद्देशून एक डायलॉग मारला आहे. "पोरींना कसं कॅमेऱ्यात दाखवतो, आम्ही पोरं आहोत ना..." असं हा तरूण बोलताना दिसत आहे.

तरूण असं बोलल्यानंतर कॅमेरामनलाही काही वेळ काय चाललं आहे ते समजलं नाही. त्याने पाठीमागे बघितलं पण त्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :CricketIPLvideo viral