परदेशात नवरा पैसे कमावत होता; इकडे बायकोला लॉटरी लागली अन् दुसऱ्यासोबत पळाली | Viral

लॉटरी लागल्यानंतर घरात चांगलं आनंदाचं वातावरण पसरायला पाहिजे होतं पण घडलं उलटंच.
Relation
RelationSakal

नवरा परदेशात आपल्या कुटुंबासाठी चांगले पैसे कमावत होता. इकडे घरी असलेल्या बायकोला तब्बल ३ कोटी रूपयांची लॉटरी लागली. लॉटरीनंतर घरात चांगलं आनंदाचं वातावरण पसरायला पाहिजे होतं पण घडलं उलटंच. लॉटरी लागल्यानंतर सदर महिलेची मनस्थिती बिघडली आणि तिने आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत लग्न केलं.

दरम्यान, हा प्रकार थायलंडमध्ये घडला आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. तीन कोटी रूपयांची लॉटरी लागल्यानंतर बऱ्याच दिवसांपर्यंत तिने आपल्या नवऱ्याला काहीच कळू दिलं नाही. काही दिवसांनंतर हा प्रकार नवऱ्याच्या लक्षात आला. तिने एका पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केलं होतं.

Relation
अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

नरीन असं पीडित व्यक्तीचे नाव असून तो ४७ वर्षाचा आहे. त्याने ११ मार्च रोजी वकीलांच्या मार्फत बायकोविरोधात तक्रार दिली आहे. त्याची बायको चाविवान हिच्यासोबत त्याचा विवाह मागच्या २० वर्षापूर्वी झाला होता. पण चाविवान हिने सांगितलं की, आमचं ब्रेकअप लॉटरी लागण्याच्या अगोदर झालं होतं. त्यानंतर मला लॉटरी लागली. पण पीडित व्यक्तीने चाविवानचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

पण पीडित व्यक्तीने सांगितलं की, "आमच्या ब्रेकअपचे कोणतेच पुरावे उपलब्ध नाहीत. आमच्या कुटुंबावर जवळपास ३ कोटी रूपयांचे कर्ज आहे, त्यासाठी मी पैसे कमावण्यासाठी दक्षिण कोरियामध्ये गेलो होतो. मी सोबत बायकोला नेलं होतं पण काही काळानंतर ती थायलंडला परत आली. मी बायकोला प्रती महिन्याच्या खर्चासाठी २७ ते ३० हजार रूपये एवढी रक्कम देत होतो. त्यानंतर मला समजलं की हिने लॉटरी लागल्यावर दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com