
Viral Video : लग्न समारंभात महिलेचा नागीन डान्स; आवरता आवरेना
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका लग्न समारंभात एक महिला भन्नाट नागीन डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. तर अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लग्न समारंभ सुरू असल्याचं दिसत आहे. लग्नाच्या मेहंदी कार्यक्रमात या महिलेने जबर डान्स केला आहे. नागीन डान्स करताना या महिलेला दुसरी एक महिला आवरताना दिसत आहे. तरी तिचा नागीन डान्स सुरूच असल्याचं दिसत आहे. या महिलेने केलेला नागीन डान्स पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.
दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर जवळपास ४० हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं असून २०० पेक्षा जास्त लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "लग्नसमारंभात अवतरला हिरवा नाग" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.