Viral Video : कॉलेजमध्ये 'चुम्मा चुम्मा' गाण्यावर मॅडमचा भन्नाट डान्स; विद्यार्थ्यांचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : कॉलेजमध्ये 'चुम्मा चुम्मा' गाण्यावर मॅडमचा भन्नाट डान्स; विद्यार्थ्यांचा जल्लोष

कॉलेज कार्यक्रमात अनेकदा विद्यार्थी भाग घेत असतात. तर कॉलेजचा सांस्कृतिक कार्यक्रम हा सर्वांसाठी कायम आठवणीत राहणारा प्रसंग असतो. सध्या अशाच एका कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक शिक्षिका व्यासपीठावर डान्स करत आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या डान्सला दाद देत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ हा pritykeshar या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सदर शिक्षिका "चुम्मा चुम्मा दे दे" या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. तर खाली बसेलले विद्यार्थी जल्लोष करून त्यांच्या डान्सला चांगली दाद देताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.