अचानक भूकंप झाल्यासारखा रस्ता दुभंगला अन् क्षणात...; थरकाप उडवणारा Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

अचानक भूकंप झाल्यासारखा रस्ता दुभंगला अन् क्षणात...; थरकाप उडवणारा Video Viral

यवतमाळ : यवतमाळमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पाण्याच्या प्रचंड दबावामुळे भूमिगत पाईपलाईन फुटल्याने चक्क रहदारीचा रस्ता दुभंगल्याचा व्हिडिओ समोर आलाय. ही थरारक घटना पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, पाईलपलाईन फुटण्यावेळी या रस्त्यावरून जाणारी दुचाकीस्वार तरुणी जखमी झालीय. पाईपमध्ये साचलेले शेकडो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने हा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. तर पाण्याच्या दबावामुळे थेट रस्त्याचा काही भाग उडून गेला आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही काळ स्थानिकांमध्येही भितीचे वातावरण होते.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.