Mimicry Video : 'द परफेक्ट मिमीक्री'; दिल्ली मेट्रोतील तरूणाच्या व्हिडिओचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Mimicry Video : 'द परफेक्ट मिमीक्री'; दिल्ली मेट्रोतील तरूणाच्या व्हिडिओचा धुमाकूळ

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही भावनिक व्हिडिओ आपल्या डोळ्यात पाणी आणायला तर काही व्हिडिओ आपल्याला हसायला भाग पाडत असतात. सध्या अशाच एका तरूणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो दिल्ली मेट्रोतील उद्घोषणेची मिमीक्री करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील तरूण दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना दिसत असून त्याच्याजवळ काही तरूण उभे आहेत. यावेळी तो मिमीक्री करत आहे. "यात्रीगण कृपया ध्यान दे, आपणी साडी, धोती, बॅग इसका ट्रेन में चढते वक्त खास ख्याल रखे... अगला स्टेशन आनंद विहार है..." अशी मिमीक्री केल्यानंतर या तरूणाला इतर तरूणांनी दाद दिली आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवरील whokrishnansh या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं आहे. तर यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 'द परफेक्ट मिमीक्री' अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :delhiMetroviral video