Viral Video : थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने उलटं बसून गाडीवरच पेटवली शेकोटी

Viral Video
Viral VideoSakal

थंडीवर मात करण्यासाठी लोकं एकापेक्षा एक जुगाड करतात. आपण सहसा शेकोटी पेटवत असतो पण सध्या दोन तरूणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण दुचाकीवरून चालले आहेत. प्रवास करत असताना दोघांनी देखील अंगावर स्वेटर घातलेलं दिसत आहे.

हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दुचाकीवरील दोन मित्रांपैकी एका तरूणाने चक्क दुचाकीवर शेकोटी पेटवली आहे. त्याने दुचाकीवर चुल ठेवली असून त्यामध्ये त्याने आग लावली आहे. तर हा व्हिडिओ मध्यप्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशातील इंदौरमधील हा व्हिडिओ असून या तरूणांचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे आपण असा प्रयोग करण्याच्या नादात पडू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com