Video : 'राधा तेरी चुनरी'वर युवतीचा भन्नाट डान्स; हॉलमध्ये केला माहोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dance Video

Video : 'राधा तेरी चुनरी'वर युवतीचा भन्नाट डान्स; हॉलमध्ये केला माहोल

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्स, अपघात सीसीटीव्ही फुटेज, लग्न, प्राणी यांच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या एका कार्यक्रमातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तरूणीचा डान्स पाहून आपणही थक्क व्हाल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका कार्यक्रमातील असून एक युवती "राधा तेरी चुनरी राधा तेरी नटखट नजरिया" या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तर तिच्या पिवळ्या ड्रेसमधील अदा आणि तिला तिथे उपस्थित असलेल्या तरूणींची दाद पाहून आपल्यालाही डान्स करण्याची इच्छा होईल.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. आत्तापर्यंत जवळपास १ लाख ६५ हजार नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.