एका बॉयफ्रेंडवरून तरूणीच्या झिंज्या उपटत काठीने मारहाण; तरूणालाही तुडवलं | Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

एका बॉयफ्रेंडवरून तरूणीच्या झिंज्या उपटत काठीने मारहाण; तरूणालाही तुडवलं | Video Viral

तरूणांच्या दोन गटातील भांडणे आपण अनेकदा पाहिले असतील पण तरूणींच्या दोन गटातील तुंबळ हाणामारी पाहिली आहे का? सध्या उत्तरप्रदेशातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तरूणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. एका बॉयफ्रेंडवरून ही हाणामारी झाल्याचं बोललं जातंय.

व्हायरल होत असलेला व्हिडिओमधील घटना उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे घडली आहे. येथील मुख्य बादार गोलघर येथील एका रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. तब्बल २० मिनिटापर्यंत दोन ते तीन तरूणींकडून एका तरूणीला काठीने आणि केसाला धरून बेदम मारहाण करण्यात आली आहे. सुरक्षासक्षकाच्या हस्तक्षेपानंतर अखेर तरूणीची सुटका करण्यात आली.

काही तरूणीने एका तरूणालाही मारल्याचं व्हिडिओत दिसत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना घडत असताना रेस्टॉरंटमधील लोकं घाबरले होते. तर पोलिसांनी आरोपी तरूणींवर गुन्हा दाखल केला असून व्हायरल झालेल्या घटनेवरून अधिकचा तपास सुरू आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.