Video Viral : "मोनू सोबतच लग्न करणार, कुणी अडवलं तर फाशी घेणार"; मध्यरात्री ती घरी आली अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video Viral : "मोनू सोबतच लग्न करणार, कुणी अडवलं तर फाशी घेणार"; मध्यरात्री ती घरी आली अन्...

लखनऊ : प्रेम हे आंधळं असतं. प्रेमात व्यक्ती काहीही करू शकतो. अनेकजणांनी आपल्याला आवडत्या व्यक्तीचं प्रेम मिळालं नाही म्हणून जीव दिल्याचं समोर आलं आहे. तर सध्या एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिने माझं लग्न मोनू नावाच्या तरूणासोबत न झाल्यास फाशी घेण्याची धमकी दिली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रात्रीच्या वेळेस एका मुलाबरोबर व्हिडिओ काढत धमकी देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती, "मी माझ्या मर्जीने माझ्या घरातून पळून आली आहे. मी मोनूसोबत लग्न करणार आहे, कुणी आडवं आलं तर मी फाशी घेईन." असं ही तरूणी बोलत आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओला शेअर केलं आहे. उत्तरप्रदेशमधील हदरोई येथील हा प्रकार घडला असल्याची माहिती असून मध्यरात्री तरूणीने हा प्रकार केला आहे. तिच्या धमकीच्या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.