Viral Video : तरूणाची वाघ, सिंह अन् बिबट्यासोबत मैत्री; सगळे एकत्रच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral VIdeo

Viral Video : तरूणाची वाघ, सिंह अन् बिबट्यासोबत मैत्री; सगळे एकत्रच...

वाघ, सिंह आणि बिबट्या हे जंगलातील प्रमुख प्राणी असतात. त्यांच्यावर हल्ला करणारे इतर प्राणी खूप कमी असतात. पण ते सगळ्याच प्राण्यांवर हल्ला करून त्यांची शिकार करत असतात. माणूसही त्यांच्या तावडीत सापडला तर त्याचीही ते शिकार करत असतात. पण सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सिंह, वाघ आणि बिबट्यांसोबत खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सात ते आठ सिंह सिंहीणी, वाघ आणि बिबट्या असून सगळ्यांच्या मध्ये व्यक्ती बसला आहे. तो एका सिंहिणीला कुरवाळताना दिसत आहे. त्यानंतर एक वाघ बिबट्यावर हल्ला करतो आणि बिबट्या व्यक्तीकडे पळत येतो.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा येईल. तर हे जंगली प्राणी पाळलेले असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. वाघ, बिबट्या, सिंह हे जंगली प्राणी एकत्र कसे आले असा प्रश्न आपल्याला पडला असेल पण हे प्राणी पाळलेले असल्यामुळे ते एकत्र राहतात. तर ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी शेअर केलं आहे.