Video Viral : संपला विषय! नियम धुडकावून तरूणाचा दुचाकीवर स्टंट; पोलिसांनी कापले 9100चे चलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Video Viral : संपला विषय! नियम धुडकावून तरूणाचा दुचाकीवर स्टंट; पोलिसांनी कापले 9100चे चलन

लखनऊ : काही तरूणांना स्टंट करण्याची आवड असते. फायर स्टंट, फ्लिप स्टंट, रायडिंग स्टंट अशा प्रकारचे स्टंट अनेकजण करत असतात. पण अनेकदा असे स्टंट अंगाशी येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण गाडीवर स्टंट करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये एक तरूण वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत गाडीवर आडवा बसून गाडी चालवताना दिसत आहे. या तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यावर कारवाई केली असून त्याला अटक केली आहे.

त्याचबरोबर त्याच्याकडून ९ हजार १०० रूपयांचे चलन कापले आहे. त्यामुळे या तरूणाला चांगलीच अद्दल घडली आहे. उत्तरप्रदेशमधील रामपूर येथील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.