
Viral Video : साडी नेसून पठ्ठ्याने गल्लीतून केला रॅम्प वॉक; गावकरी झिंगाट
सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नातील, शाळेतील, डान्सचे, लहान मुलांचे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही व्हिडिओचा यामध्ये सामावेश असतो. सध्या एका गावातील व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो गावातून साडी घालून फिरताना दिसत आहे.
आपण एखादी तरूणी साडी नेसून मॉडेलिंगच्या कार्यक्रमात रॅम्प वॉक करताना पाहिली असेल. पण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती साडून नेसून गावातील गल्लीतून रॅम्प वॉक करताना दिसत आहे. हे पाहून गावकरीसुद्धा वेडे झाले आहेत. तर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.
दरम्यान, या व्यक्तीला पाहून अनेक तरूण त्याच्याजवळ जमा झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या तरूणाने साडीबरोबर ब्लाऊज घातलं नाही म्हणून अनेक नेटकऱ्यांनी यावर विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.