
Viral Video : मगरीसोबत पाण्यात पोहली युवती; खतरनाक व्हिडिओ पाहून झोप उडेल
मगर, साप, अजगर यांच्यासारखे प्राणी पाहून आपल्या अंगावर काटा येतो पण सध्या एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ती चक्क मगरीसोबत पाण्यात खेळताना दिसत आहे. या तरूणीचा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.
अधिक माहितीनुसार, मगरीसोबत पाण्यात पोहणाऱ्या तरूणीचं नाव आहे गॅबी. ती मागच्या अनेक वर्षांपासून मगरीसोबत खेळत असल्याची माहिती आहे. तर इतर पर्यटकसुद्धा या मगरीसोबत खेळू शकतात असंही या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
त्याचबरोबर हे पाळीव प्राणी नसून पूर्णपणे जंगली प्राणी आहेत. वनात किंवा अंगणात खेळत असताना असे प्राणी दिसले की अनेकजण त्यांना मारून टाकतात पण आम्ही त्यांना घरी आणतो आणि योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना जंगलात सोडून देतो असंही सांगण्यात आलं आहे.
दरवर्षी ७ ते ८ हजार प्राणी गोळ्या घालून मारले जातात. त्यांना पकडून जंगलात सोडण्याचं काम आमची संस्था करते असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे. पण हा व्हिडिओ पाहून आपणही घाबरून जाल. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या कमेंट केल्या आहेत.