
Viral Video : ZPच्या शाळेतलं टॅलेंट! 'तू मान मेरी जान' गाण्यावर चिमुकल्याचं गायन अन् नेटकरी सैराट
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये डान्स, अपघात, चोरी, लग्न, गाणे अशा व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये शाळेतील एक मुलगा हिंदी गाणं गाताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शाळेतील असून त्याने "तू मान मेरी जान" हे गाणं सुरात गायलं आहे. त्याचा सूर आणि ताल पाहून अनेक नेटकरी भारावले आहेत. असं टॅलेंट फक्त शाळेतंच मिळतं अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून या चिमुकल्याचं गायन ऐकून आपणही थक्क व्हाल.
दरम्यान, इंस्टाग्रामवरील r_h_chauhan या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला ३.७ दशलक्ष लोकांनी लाईक केलं आहे. तर जवळपास ४५ हजार लोकांनी कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ आणि या शाळेतील चिमुकल्याचं गायन ऐकून "हे टॅलेंट फक्त झेडपी शाळेतंच मिळतं" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.