esakal | तृतीयपंथीयांना लवकरच मिळणार आर्थिक साहाय्य
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Mantralaya

तृतीयपंथीयांना लवकरच मिळणार आर्थिक साहाय्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना काळात सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेला घटक तृतीयपंथी नागरिक. त्यांच्या उपचारापासून रोजच्या उदरनिर्वाह पर्यंत सर्वच प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले आहे. या संबंधी ‘सकाळ’ने वृत्तही प्रसिद्ध केले होते. आता तृतीयपंथीय नागरिकांना कोरोना काळात अर्थसाहाय्य म्हणून राज्य शासनातर्फे एक हजार ५०० रुपयांची मदत देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे.

समाजकल्याण आयुक्तालयाचे सहआयुक्त रविंद्र कदम यांनी यासंबंधी शासन आदेश काढला आहे. त्यांनी समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ, तसेच जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने तृतीयपंथीयांची जिल्ह्यातील संख्या आणि आर्थिक भाराचा तपशील राज्य शासनाला सादर करावयाचा आहे. तृतीयपंथीयांना ही मदत कशी पोचवता येईल याचा आराखडाही सादर करावा, असे कदम यांनी आदेशात म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सोमवार (ता.२६) पर्यंत ही माहिती राज्यशासनाकडे सादर करायची आहे.