esakal | स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज... जरुर वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

Competitive Exam Students.png

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज... जरुर वाचाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राज्यात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झालं आहे. तेव्हापासून शाळा, महाविद्यालये, उद्योग, धंदे बंद पडले. गेल्या महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली, त्यामुळे अनेक उद्योग सुरु झाले. मात्र, शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार हे अनिश्‍चित आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात जातात. मात्र, सध्या तेही घरात बसून आहेत. मात्र आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कोरोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ‘बार्टी’ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससी इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी ‘बार्टी’च्या http://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील ‘एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज’ या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी  सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या क्लासेसचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले.