esakal | 'परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद' : माजी गृहमंत्री अनिल देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

'परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद' : माजी गृहमंत्री अनिल देशमुख

'परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद' : माजी गृहमंत्री अनिल देशमुख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर सापडणे व मनसुख हिरेन (Mansukh Hiren death) हत्या प्रकरणात सचिन वाझे (Sachin Waze) व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची भूमिक संशयास्पद असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांनी केलेल्या खोटया आरोपावरुन आपणावर जो सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे त्या विरोधात न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात (Bombay High court) दात मागितली असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली. (Param Bir Singhs stand is doubtful said Anil Deshmukh)

हेही वाचा: ‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच

परमबीर सिंग यांनी शंभर कोटी रुपये मागितल्याचा आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. सीबीआयने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी केली जात आहे. मात्र या सर्व प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशायास्पद आहे. सचिन वाझे व परमबिर सिंग यांच्या गंभीर चुका होत्या आणि त्या माफ करण्यालायक नव्हत्या.

त्याचा तपास एनआयए करीत आहे. त्याच कारमामुळे आपण त्यांची मुंबई आयुक्त पदावरून बदली केली होती. या संदर्भात एका कार्यक्रात जाहीर वक्तव्यसुध्दा केले होते. त्यामुळे सिंग यांनी आपल्यावर खोटे आरोप केले. कुठलेही पुरवे सिंग यांनी दिलेल नाही. एक पत्र देऊन खोटे आरोप केले आहे. त्याची शहनिशा होणे आवश्यक आहे. याविरोधात न्याय मागण्यासाठी आपण उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

हेही वाचा: दिलासादायक! नागपुरात एकाच दिवशी तब्बल ७ हजार ३४९ जणांची कोरोनावर मात

३० वर्षांच्या राजकीय जीवनात आपणावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही याकडेही अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले.

(Param Bir Singhs stand is doubtful said Anil Deshmukh)