पर्यटनाला चालना देण्याची मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

budget 2023  campaign to promote tourism Nirmala Sitharaman pm modi

अतिथी देवोभव हे ब्रीद अन्् अतुल्य भारत हे घोषवाक्य असलेल्या देशात पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी मोहीम

पर्यटनाला चालना देण्याची मोहीम

अतिथी देवोभव हे ब्रीद अन्् अतुल्य भारत हे घोषवाक्य असलेल्या देशात पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल. त्यासाठी राज्यांचा सक्रिय सहभाग, सरकारी कार्यक्रम, सार्वजनिक-खासगी भागिदाऱ्या यांचे अभिसरण साधण्यात येईल.

निर्मला सीतारामन त्यांच्या भाषणात म्हणाल्या की, स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांसाठी भारत हा प्रचंड आकर्षण आहे. या क्षेत्रात विलक्षण क्षमता असून त्यादृष्टिने प्रयत्न केले जातील. खास करून तरुणांसाठी रोजगार आणि उद्योजकतेची प्रचंड मोठी संधी या क्षेत्रात आहे.

२०२३ भारताला भेट देण्याचे वर्ष

पर्यटनाला चालना देण्याची प्रक्रिया केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्यादिवशीच सुरु झाली. दिल्लीत मंगळवारी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी व्हिजिट इंडिया इयर २०२३ उपक्रमाला प्रारंभ केला.

बोलके बोधचिन्ह

नमस्ते अर्थात दोन्ही हात जोडलेली स्थिती दर्शविणाऱ्या बोधचिन्हाचे मंगळवारी अनावरण झाले. त्यात सणवार, संतांपासून सात्त्विक आहारशास्त्र अशा नानाविध वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

जी२० अध्यक्षपदामुळे चालना

जी२० समुहाचे अध्यक्षपद गेल्या वर्षी एक डिसेंबर रोजी भारताला मिळाले. ९-१० सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक परिषदेसह ५५ ठिकाणी २०० पेक्षा जास्त बैठका होणार आहेत. त्यानिमित्ताने सदस्य देशांचे एका लाखापेक्षा जास्त प्रतिनिधी भारतात येणार आहेत. त्यांना अतुल्य भारतचे दर्शन घडविण्यात येईल. अध्यक्षपदाद्वारे पर्यटनाला चालना देण्यावर मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले आहे.

३६५ दिवसांची संकल्पना

भारतात पर्यटन क्षेत्रातील अनेक संधींचे चीज करण्यास वाव आहे. त्यादृष्टिने वर्षातील सर्व ३६५ दिवस पर्यटनास वाव आहे अशा भूमिकेतून मंत्रालय काम करेल.

परदेशी पाहुणा बनावा सांस्कृतिक दूत

जी२० बैठकांसाठी भारतात येणारा प्रत्येक परदेशी पाहुणा हा भारताचा सांस्कृतिक बनूनच त्याच्या देशात परत जावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्येयदृष्टी आहे.

प्रमुख उपक्रम

युनिटी मॉल ः प्रत्येक राज्यांच्या राजधानीत किंवा सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन केंद्रात किंवा आर्थिक राजधानीत युनिटी मॉल स्थापन करण्यास प्रोत्साहन, तेथे एक जिल्हा-एक उत्पादन, जीआय उत्पादने, हस्तकला साहित्यांची विक्री करण्याची सुविधा, इतर राज्यांची अशी उत्पादनेही विक्रीस उपलब्ध

देखो अपना देश...

  • ५० केंद्रांची निवड ः पर्यटनाचे संपूर्ण पॅकेज म्हणून ५० ठिकाणांचा विकास

  • पर्यटनाचा अनुभव समृद्ध व्हावा म्हणून अॅपची निर्मिती

  • ‘देखो अपना देश'' उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कौशल्य, उद्योजकता विकास

  • एकूण तरतूद २४०० कोटी