esakal | Budget 2021 : पगारदारांची निराशा तर वृद्धांना दिलासा; वाचा टॅक्सबाबतच्या घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Income-tax

केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यामध्ये आयकरात सूट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अशी कोणतीच घोषणा त्यांनी केली नाही. दुसरीकडे वृद्धांना दिलासा मिळाला असून 75 वर्षांवरील व्यक्तींसाठी करात सूट देण्यात येणार आहे.

Budget 2021 : पगारदारांची निराशा तर वृद्धांना दिलासा; वाचा टॅक्सबाबतच्या घोषणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यामध्ये आयकरात सूट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अशी कोणतीच घोषणा त्यांनी केली नाही. दुसरीकडे वृद्धांना दिलासा मिळाला असून 75 वर्षांवरील व्यक्तींसाठी करात सूट देण्यात येणार आहे. 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना आयकर रिटर्न भरावा लागणार नाही.

Budget 2021: FM निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील मोठ्या घोषणा; एका क्लिकवर

- 75 वर्षावरील नागरीकांना पेन्शंनमधून मिळणाऱ्या उत्पनावर रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही.
- गुंतवणूक वाढविण्यासाठी काँर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय
- डिव्हीडंडमधून मिळणाऱ्या उत्पादनावरच्या करात कपात.
- जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी 6 वर्षाऐवजी 3 वर्षाच रेकाँर्ड तपासणार
- टँक्स आँडीटची मर्यादा 5 कोटींवरुन 10 कोटींवर
- मोबाईलची कस्टम ड्युटी वाढवून 2.5 टक्यांवर.
- मोबाईलचे काही पार्टसनाही आता टँक्स लागणार
- GST प्रक्रिया अजून सोप्पी करण्यावर भर देणार जुन्या 400 नियमांचा अभ्यास करणार

Union Budget 2021 : LIC बाबत मोठी घोषणा; विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढणार

कोरोनामुळे सरकारसमोर मोठं आर्थिक संकट असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. सरकारला यासाठी 80 हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी उभारण्यासाठी अनेक योजनांची तरतूद करण्यात आल्याचे निर्मला सीतारमण म्हणाल्या. भारतात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन हजार कोटींहून अधिक रुपयांची तरतूद कऱण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1.72 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसंच शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं उद्दीष्ट असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

Budget 2021: रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी बजेटमध्ये मोठ्या घोषणा

Edited By - Prashant Patil

loading image