Budget 2021: टीम इंडियाप्रमाणे परफॉर्मन्स करु; निर्मला सीतारमण यांचा संकल्प

टीम-ईसकाळ
Monday, 1 February 2021

आपला देश हा क्रिकेट प्रेमींचा आहे. नुकतेच आपण टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात केलेली कामगिरी पाहिली आहे. सुरुवातीच्या काळात बिकट अवस्थेतून सावरत टीम इंडियाने जिंकून दाखवले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे अर्थव्यवस्थेला उभारी देताना त्यांनी क्रिकेटचा उल्लेख केला.  टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जशी कामगिरी केली तशीच कामगिरी करण्यासाच प्रयत्न करु, असे त्या म्हणाल्या. 

निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात रविंद्रनाथ टागोर यांच्या ओळीचाही उल्लेख केला, "Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark."  'विश्‍वास हा असा पक्षी आहे जो पहाटेच्या अंधारात प्रकाशाची चाहूल ओळखतो. भारत सध्या नव्या युगाच्या उंबरठ्यावर आहे, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर विकास साध्य करु, अशा आशयाचे विधानही त्यांनी आपल्या भाषणात केले. 

Union Budget 2021 : गाड्यांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा,ऑटोमोबाईल क्षेत्रात चैतन्य

आपला देश हा क्रिकेट प्रेमींचा आहे. नुकतेच आपण टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात केलेली कामगिरी पाहिली आहे. सुरुवातीच्या काळात बिकट अवस्थेतून सावरत टीम इंडियाने जिंकून दाखवले. अशा प्रेरणेतूनच  अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या.  

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टीम इंडियाची कामगिरी प्रेरणादायी असल्याचे म्हटले होते. अर्थसंकल्पापूर्वी  'मन की बात या कार्यक्रमात त्यांनी भारतीय संघाने पिछाडीवर राहुन पुढे जाऊ शकतो हे दाखवून दिल्याचा उल्लेख केला होता. पंतप्रधान यांच्या या विधानानंतर बीसीसीआयने त्यांचे आभारही मानले होते.  कोरोनाच्या संकटाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यातून सावरुन अर्थव्यवस्था ट्रॅकवर आणण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. कोरोनाच्या संकट काळात जीडीपी दर निच्चांकी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget updates nirmala sitharaman talks about team india win on australian soil in budget 2021 speech