Ganesh Festival : निजामपूरला साजरा होतोय पेशवेकालीन गणपतीचा ऐतिहासिक उत्सव!

प्रा. भगवान जगदाळे
Sunday, 16 September 2018

सुरवातीला हे पेशवेकालीन गणपती मंदिर प्राचीन स्वरूपात होते. सुमारे 12 वर्षांपूर्वी धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते विनायकराव शुक्ल व बापूराव शुक्ल यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला असून त्यांनी स्वखर्चाने गावासाठी हे भव्यदिव्य गणपती मंदिर बांधून दिले आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील पेशवेकालीन प्राचीन गणपती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंदिर परिसरात मोठया प्रमाणात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील शेकडो भाविक मोठया संख्येने दर्शनाचा लाभ घेत आहेत.

मंदिरात दररोज सकाळी आठला व  संध्याकाळी साडे आठला आरती होते.
दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच भाविक दात्यांकडून बक्षीस वितरणही करण्यात येते.

सुरवातीला हे पेशवेकालीन गणपती मंदिर प्राचीन स्वरूपात होते. सुमारे 12 वर्षांपूर्वी धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते विनायकराव शुक्ल व बापूराव शुक्ल यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला असून त्यांनी स्वखर्चाने गावासाठी हे भव्यदिव्य गणपती मंदिर बांधून दिले आहे.

निजामपूर येथील प्रसिध्द उद्योजक, व्यापारी व नंदुरबार मर्चंट बँकेचे निजामपूर शाखा चेअरमन राजेंद्रभाई बिहारीलाल शाह हे देखरेख करतात. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते त्रिलोक दवे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

'प्राचीन गणपती मंदिर हे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले ऐतिहासिक शिवकालीन मंदिर असून त्याला खूप मोठा प्राचीन इतिहास आहे.' - हर्षदराय गांधी, सामाजिक कार्यकर्ते, निजामपूर

'ऐतिहासिक, पेशवेकालीन गणपती मंदिराची देखभाल करताना परमार्थ, परोपकार व जनसेवा केल्याचे आत्मिक व अध्यात्मिक समाधान मिळते.' -
राजेंद्र बिहारीलाल शाह, सामाजिक कार्यकर्ते, निजामपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Historical celebration of Peshwas ganapati in Nizampur