शिल्पांना सजीव करणारा श्रेयस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

त्र्यंबकेश्‍वरला जाताना गर्गे आर्टस्‌ स्टुडिओ लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात प्रचंड शांतता असणाऱ्या या स्टुडिओतून आतापर्यंत नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारी अनेक शिल्पे तयार गेली आहेत. त्यात शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प, नाशिक रोड, लेखानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प, औरंगाबाद नाक्‍यावरील वीर सावरकरांचा जीवनप्रवास, आर्टिलरी सेंटरमधील तीन शिल्पे, शकुंतला- दुष्यंत, महात्मा फुले कलादालन येथील शिल्प असो. एवढचं काय, तर अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील महात्मा गांधींचे शिल्पदेखील श्रेयस मदन गर्गे याच्या गर्गे आर्टस्‌ स्टुडिओत तयार झाले आहे.

त्र्यंबकेश्‍वरला जाताना गर्गे आर्टस्‌ स्टुडिओ लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात प्रचंड शांतता असणाऱ्या या स्टुडिओतून आतापर्यंत नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारी अनेक शिल्पे तयार गेली आहेत. त्यात शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प, नाशिक रोड, लेखानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प, औरंगाबाद नाक्‍यावरील वीर सावरकरांचा जीवनप्रवास, आर्टिलरी सेंटरमधील तीन शिल्पे, शकुंतला- दुष्यंत, महात्मा फुले कलादालन येथील शिल्प असो. एवढचं काय, तर अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील महात्मा गांधींचे शिल्पदेखील श्रेयस मदन गर्गे याच्या गर्गे आर्टस्‌ स्टुडिओत तयार झाले आहे. मातीतून आकार देणारा तरुण शिल्पकार श्रेयस गर्गे त्याचा प्रवास सांगतोय, "युवारंग‘ला...

श्रेयस शाळेतील सर्वसाधारण विद्यार्थी. इयत्ता दहावीनंतर पुढे काय करायचे, हा प्रश्‍न होताच. कधी आपल्या हातून शिल्पं घडतील, असे स्वप्नातही वाटले नाही. तरी त्याने सुटीत एक शिल्प तयार करून दाखवले. कधी चित्रकलेची परीक्षाही दिली नव्हती. मग एक वर्षाचा गॅप घेऊन त्याने ग्रेडच्या परीक्षा दिल्या. "मविप्र‘मध्ये "स्कूल ऑफ फाइन आर्टस्‌‘ला एक वर्षाचा फाउंडेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर मुंबईला चार वर्षे जे.जे.तून शिक्षण घेतले. 

शिल्पकार म्हणून जगताना त्याला 12 वर्षे होत आली, पण आतापर्यंत त्याने भारतभर एवढी शिल्पे तयार केली आहेत, की शिल्पांचा नेमका आकडा त्याला आता सांगता येणार नाही. सुरवातीच्या काळात त्याने नाशिक उद्यान विभागातर्फे आयोजित "फुलराणी‘चा फिरता करंडक बनवला होता. संत गाडगेबाबा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, अण्णा भाऊ साठे, गौतम बुद्ध, काळाराम मंदिर, सुंदरनारायण मंदिर आणि विविध संकल्पनांवर आधारित शिल्पे तयार केली आहेत.
 

एखाद्या कलाकाराचा कलेचा भन्नाट प्रवास ऐकताना तो एका वेगळ्याच विश्‍वात जगत असतो, हे प्रत्येक वेळी श्रेयसशी बोलताना जाणवते. शिल्पकार कलेचे सौंदर्य हे थ्रीडीमध्ये कल्पित करतो. सर्वांगाने विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली म्हणून त्यांना राज्यघटनेचे "शिल्पकार‘ संबोधले जाते. शिल्पकाराचे तसेच असते. एखाद्या विषयानुसार शिल्प करावयाचे असल्यास त्याचा सर्वांगाने विचार करून तो प्रत्यक्षात शिल्प साकारतो.

Web Title: The craft living Shreyas