औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : रमानगरचे अस्तित्व धोक्‍यात

photo
photo

औरंगाबाद : रमानगरमध्ये (वॉर्ड क्र. 70, पुरुष खुला) बहुसंख्य बौद्ध मतदार असतानाही वॉर्डाचा वीस टक्के भाग क्रांती चौक वॉर्डाला जोडण्यात आला. आकाशवाणीच्या नवीन भागाचा समावेश केला. त्यामुळे दलित उमेदवार निवडून येणार नाही ही खेळी असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया रमानगर वॉर्डातून उमटल्या आहेत. 

रमानगर वॉडॉमध्ये मोठ्या संख्येने दलित मतदार आहे. असे असतानाही दलितांच्या मतांचे अन्य वॉर्डांमध्ये विभाजन करण्यात आले. या नविन रचनेमुळे पारंपारीक असलेल्या मतदारांना आपल्या हक्काचा नगरसेवक निवडता येणार नाही असा आरोप नगरीक करत आहेत. या भागात उमेदवार लादल्या जाण्याची शक्‍यता असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत. 

असा झाला बदल 

उत्तर दिशेला : रामानंद कॉलनी ते एचडीएफसी बॅंक, अमरप्रीत सिग्नल, मोंढा नाका सिग्नल ते गुरुद्वारा कमान. पूर्व दिशेला : आकाशवाणी चौक ते मराठा दरबार हॉटेल, विष्णूनगरचा भाग. दक्षिण दिशेला : परळीकर यांचे निवासस्थान ते बालाजी मंगल कार्यालय ते आनंद इलेक्‍ट्रिकल गल्ली, बालाजीनगर ते गोधा यांचे घर, दक्षिणेकडे जाणारा रस्ता, चेतनानगर, काल्डा कॉर्नरपर्यंत. पश्‍मिच दिशेला : काल्डा कॉर्नर, चेतनानगर ते पेट्रोलपंप ते कमलाकर साळुंके यांचे निवासस्थान. यश होमिओपॅथी ते विवेक किराणा गल्ली नंबर तीन ते मनपा समाजमंदिर. 

असा आहे वॉर्ड 

लोकसंख्या : 12099 
अनुसूचित जाती : 4277 
अनुसूचित जमाती : 85 

रमानगर हा अनुसूचित जातीचा पारंपरिक वॉर्ड आहे. रचना बदलण्याऐवजी नवीन काही भाग जोडून मतदारसंघ मोठा करता आला असता. आता या भागावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मुळ रचना कायम ठेवून वॉर्डाची घोषणा केली पाहिजे. 
- संतोष हिवराळे 

रमानगर वॉर्डाची मूळ रचना बदलून या भागावर अन्याय केला आहे. मूळ बौद्ध उमेदवार निवडून येणार नाही अशा पद्धतीची रचना तयार करण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी या भागातील मतदारांवर अन्याय केला आहे. 
- अशोक साळवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com