मालेगाव हादरले! १० आणि ५ दिवसांच्या बाळांना कोरोना..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

सोमवारी (ता.११) प्राप्त झालेल्या ०८ अहवालात ०५ निगेटिव्ह तर ०३ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात मालेगावातील १० दिवसांची चिमुकली आणि ५ दिवसांच्या बालकास कोरोनाची लागण लागल्याची माहिती मिळत आहे. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.बाधितांमध्ये चंदनपुरी येथील १० दिवसांच्या चिमुकलीचा समावेश तर
विंचूर-लासलगाव येथील ०५ दिवसांचा मुलगा पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

नाशिक / मालेगाव : सोमवारी (ता.११) प्राप्त झालेल्या ०८ अहवालात ०५ निगेटिव्ह तर ०३ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात मालेगावातील १० दिवसांची चिमुकली आणि ५ दिवसांच्या बालकास कोरोनाची लागण लागल्याची माहिती मिळत आहे. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.बाधितांमध्ये चंदनपुरी येथील १० दिवसांच्या चिमुकलीचा समावेश तर
विंचूर-लासलगाव येथील ०५ दिवसांचा मुलगा पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

शनिवार - रविवार 11 जणांचा मृत्यू झाल्याने मालेगाव हादरले

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (ता. 10) तब्बल 38 रुग्णांची भर पडली असून, मालेगावमध्ये शनिवारी रात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याने मालेगाव हादरले आहे. तीन संशयित रुग्णांचाही मृतांमध्ये समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या जिल्ह्यात 29 वर पोचली आहे, तर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 674 झाली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूने सटाण्यापाठोपाठ ताहाराबादमध्ये शिरकाव केला असून, निफाड, येवला तालुक्‍यातील वाढती रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. 

धक्कादायक...!
▪मालेगावमध्ये १० दिवसांच्या चिमुकली आणि ५ दिवसांच्या बालकास कोरोनाची लागण...

▪आता प्राप्त झालेल्या ०८ अहवालात ०५ निगेटिव्ह तर ०३ पॉझिटिव्ह...
▪एका रुग्णाचा मृत्यू...
▪बाधितांमध्ये १० दिवसांच्या चंदनपुरी येथील चिमुकलीचा समावेश...
▪विंचूर-लासलगाव येथील ०५ दिवसांचा मुलगा पॉझिटिव्ह…
 

कोरोनामुक्तांचीही वाढतेय संख्या 
नाशिक शहरातील सात रुग्ण रविवारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यात अंबडच्या संजीवनगरमधील एकाच कुटुंबातील पाच, नाशिक रोडचा फळविक्रेता आणि जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरचा समावेश आहे. या सर्वांचा तिसरा रिपार्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, सोमवारी (ता. 11) आणखी 30 ते 35 जण कोरोनामुक्त होण्याची शक्‍यता आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या मालेगावात बंदोबस्त करताना कोरोनाची लागण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची आहे. दरम्यान, मालेगावमध्येही दोन दिवसांत 17 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 and 5 day old babies affected Corona virus nashik marathi news