दहावी-बारावीच्या नाशिक विभागातील विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा; ५ ते १० डिसेंबरपर्यंत पेपर

exams_9927.jpg
exams_9927.jpg

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवार (ता. २०)पासून दहावी-बारावीची नोव्हेंबर-डिसेंबरची लेखी परीक्षा सुरू होत आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार ६० विद्यार्थी दहावीची, तर सात हजार ४०८ विद्यार्थी बारावीची परीक्षा देतील. दहावीची लेखी परीक्षा ५ डिसेंबर आणि बारावीची परीक्षा १० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठी विभागात ६४ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक-तोंडी परीक्षांना बुधवार (ता. १८)पासून सुरवात झाली आहे.


बारावीची लेखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हा अन् शाखानिहाय संख्या
(कंसात जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची संख्या)

नाशिक : कला- दोन हजार २२३, विज्ञान- ५५५, वाणिज्य- ७११, किमान कौशल्य-३७५, एकूण- तीन हजार ८६४ (१३).
धुळे : कला- ४५७, विज्ञान- १६९, वाणिज्य- ७७, किमान कौशल्य- ७१, एकूण- ७७४ (४).
जळगाव : कला-७८४, विज्ञान- २३४, वाणिज्य- १७८, किमान कौशल्य- ७९, एकूण- एक हजार २७५ (८).
नंदुरबार : कला- ९८५, विज्ञान- ३७१, वाणिज्य- ७८, किमान कौशल्य- ६१, एकूण- एक हजार ४९५ (२९).

नाशिक विभागातील ५७ शिक्षकांची नेमणूक

बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यासाठी १३ केंद्र संचालक, १२ परीक्षक, धुळ्यासाठी चार केंद्र संचालक व तीन परीक्षक, जळगावसाठी आठ केंद्र संचालक आणि आठ परीक्षक, नंदुरबारसाठी चार केंद्र संचालक व चार परीक्षक अशा एकूण ५६ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी केंद्र संचालक आणि परीक्षक म्हणून नाशिक विभागातील ५७ शिक्षकांची नेमणूक झाली आहे.

दहावीच्या परीक्षार्थींची संख्या
जिल्ह्याचे नाव विद्यार्थिसंख्या

नाशिक १ हजार ८४२
धुळे ३८७
जळगाव १ हजार ८४
नंदुरबार ७४७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com