जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींमध्ये "माझी वसुंधरा अभियान";1500 गुणांचे होणार मूल्यांकन

gram panchayat.jpg
gram panchayat.jpg

नाशिक : (नामपूर) पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने निसर्गपूजक पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पचतत्वांवर आधारीत जीवनपद्धती जगण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने 'माझी वसुंधरा अभियान' असा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 13 मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश त्यात करण्यात आला आहे. 

अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम

31 मार्चपर्यंत ग्रामपातळीवर अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गुणांकणानुसार विजेत्या पंचायतींचा जागतिक पर्यावरणदिनी ( 5 जून ) सन्मान होणार आहे. जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे, पर्यावरण, वातावरणातील बदलांनुसार घडणाऱ्या घटनांचे परिणाम सहन करण्याची सवय निर्माण व्हावी, यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जातील. 

तीन संस्थांना 5 जून रोजी बक्षिस वितरण

वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण व स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणाऱ्या बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जाईल. अभियानाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध उपक्रमांचे 1 एप्रिल ते 31 मे 2021 याकाळात त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक घटकांवर आधारित 1500 गुणांचे मूल्यांकन होणार आहे. मूल्यांकनामध्ये अमृत शहर, नगर परिषद, नगर पंचायती, ग्रामपंचायती अशा प्रत्येकी तीन संस्थांना 5 जून रोजी बक्षिस वितरण केले जाणार आहे. 

जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती अशा 

नामपूर, पिंपळगाव बसवंत, दाभाडी, उमराणे, कसबेसुकेणे, अंदरसुल, नगरसुल, चांदोरी, पिंप्री सय्यद, पळसे, विंचूर, कसबेवणी, वडनेरभैरव, 

नामपूर शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. वसुंधरा अभियानात बागलाण तालुक्यातील निवड झालेले नामपूर हे एकमेव शहर आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी शहरातील पर्यावरणप्रेमी, सुजाण नागरिक, व्यापारी, आजी, माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण यांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा आहे. वसुंधरा अभियानामुळे नामपूरमधील सामाजिक एकोपा टिकून राहील. - भैय्यासाहेब सावंत, प्रशासक व विस्तार अधिकारी नामपूर  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com