COVID-19 : नेपाळवरुन यात्रा करुन परतलेल्या 'त्या' 14 प्रवाशांची तपासणी; 14 दिवस असणार देखरेखीखाली

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

नाशिक रोड पशुपतीनाथ नेपाळवरून यात्रा उरकून घरी परतणाऱ्या 14 नाशिककर प्रवाशांची नाशिक महानगरपालिकेच्या बिटको हॉस्पिटल व रेल्वे स्वास्थ केंद्राच्या सहकार्याने आरपीएफच्या सुरक्षाव्यवस्थेत तपासणी करण्यात आली. यावेळी या नाशिककर यात्रेकरूंना चौदा दिवस सक्त घरी राहण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला असून या लोकांची घरी ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांनी दिली आहे.

नाशिक : नाशिक रोड पशुपतीनाथ नेपाळवरून यात्रा उरकून घरी परतणाऱ्या 14 नाशिककर प्रवाशांची नाशिक महानगरपालिकेच्या बिटको हॉस्पिटल व रेल्वे स्वास्थ केंद्राच्या सहकार्याने आरपीएफच्या सुरक्षाव्यवस्थेत तपासणी करण्यात आली. यावेळी या नाशिककर यात्रेकरूंना चौदा दिवस सक्त घरी राहण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला असून या लोकांची घरी ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांनी दिली आहे.

साठ वर्ष वयापुढील बारा महिला व दोन पुरुष यांचे आरोग्य तपासणी

दहा मार्च रोजी नाशिकच्या हिरेनगरमधील बारा महिला व दोन पुरुष नेपाळ येथे असणाऱ्या पशुपतिनाथचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव व प्रादुर्भाव वाढल्यामुळे नेपाळ येथील दर्शन उरकून घरी परतणाऱ्या नाशिककर यात्रेकरूंची माहिती सूत्रांकडून प्रशासनाला मिळाल्यामुळे नाशिक महानगरपालिका व रेल्वेच्या सौजन्याने या यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी रेल्वेच्या सुश्रुषा केंद्रात नेऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी साठ वर्ष वयापुढील बारा महिला व दोन पुरुष यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर गोरखपुर एक्सप्रेसच्या बी वन कोचमध्ये हे प्रवासी असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. नासिकरोड बिटको हॉस्पिटल येथील डॉक्टर जितेंद्र धनेश्वर डॉक्टर विजय देवकर, सिस्टर एस व्ही आसरानी, व्ही पी केदारी, एम एन शिंदे व इतर वैद्यकीय टीमने या प्रवाशांना खाली उतरल्यावर रेल्वेचा प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील सुश्रुषा केंद्रात नेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. या यात्रेकरूंना चौदा दिवस कायमस्वरूपी घरी थांबण्याचा सल्ला दिला असून त्यांची घरी तपासणी केली जाणार आहे. यावेळी आर पी एफचे अरुण देसले, ए सी दुबे, दिलीप यादव यांनी सुरक्षा पुरवली. रेल्वेचे स्टेशन मास्तर आर के कुठार कुंदन महापात्रा यांच्यासह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी यात्रेकरूंची सेवा करण्यासाठी उपस्थित होते.

नेपाळमध्ये ही चाचणी

यावेळी यात्रेकरूनमधील एका व्यक्तीने दैनिक सकाळला सांगितले की, आमची चाचणी नेपाळमध्ये करण्यात आली असून आम्ही भारत नेपाळ सीमा सोडल्यावर सोनाली येथील सीमेवरील बॉर्डर बंद करण्यात आली आहेत. बसने प्रवास करावा लागल्यामुळे सीमेवर प्रत्येक भारतीय नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच, भारताच्या सीमेवरही नेपाळ येथून येणाऱ्या वर जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. भारत नेपाळ ही बॉर्डर ओलांडणारे आम्ही नाशिककर शेवटचे प्रवासी होतो.

Image may contain: one or more people and people sitting

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

यात्रेकरूंची प्राथमिक तपासणी करून आम्ही यात्रेकरूंना घरी राहण्याचा सल्ला दिला असून चौदा दिवस ते निरीक्षणाखाली राहणार आहेत. - डॉ विजय देवकर

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 14 passengers traveling from Nepal are under observation nashik marathi news