#COVID19 : नाशिकमध्ये चक्क 'इतके' होम कोरोंटाईन! 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना देशातून आलेल्यापैकी युएई मधून सर्वाधिक 76 नागरिक आले आहेत. इटली मधून सात तर सौदी मधून दोन, जर्मनी मधून दहा, चीन मधून दोन तर युएसए मधून वीस, युके मधून 28 तर इतर देशांतून 142 नागरिक आले. आतापर्यंत 287 परदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आली. पंधरा दिवस सर्वेक्षण पुर्ण झालेले 21 नागरिक, सर्वेक्षणाखाली 266 तर रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या 45 आहे.

नाशिक : कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्या नागरिकांची नाशिकमध्ये संख्या सातत्याने वाढताना दिसतं असून आज हा आकडा 287 पर्यंत पोहोचला आहे. चौदा दिवसांचे सर्वेक्षण पुर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 21 असून सोमवारी सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या 266 पर्यंत पोहोचली. सुदैवाने कोरोना दुषित रुग्णांची संख्या शुन्य आढळल्याने नाशिककरांसाठी हा आकडा दिलासादायक ठरणारा आहे. 

आतापर्यंत निगेटिव्ह रिपोर्ट हाती
कोरोना देशातून आलेल्यापैकी युएई मधून सर्वाधिक 76 नागरिक आले आहेत. इटली मधून सात तर सौदी मधून दोन, जर्मनी मधून दहा, चीन मधून दोन तर युएसए मधून वीस, युके मधून 28 तर इतर देशांतून 142 नागरिक आले. आतापर्यंत 287 परदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आली. पंधरा दिवस सर्वेक्षण पुर्ण झालेले 21 नागरिक, सर्वेक्षणाखाली 266 तर रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या 45 आहे. आतापर्यंत 44 निगेटिव्ह रिपोर्ट हाती आले आहेत. 

हेही वाचा > #COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 287 Home Quarantine in Nashik marathi news