
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागतासाठी उत्तर महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या श्री सप्तशृंगीदेवीचे मंदिर ३१ डिसेंबरला भाविकांसाठी २४ तास खुले राहणार आहे.
वणी (जि.नाशिक) : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागतासाठी उत्तर महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या श्री सप्तशृंगीदेवीचे मंदिर ३१ डिसेंबरला भाविकांसाठी २४ तास खुले राहणार आहे.
३१ डिसेंबरला भाविकांसाठी २४ तास खुले
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयातून मंगळवारी (ता. २९) पौर्णिमेनिमित्त सकाळी सातला आदिमायेच्या आभूषणांची साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ट्रस्टचे कार्यालयीनप्रमुख प्रकाश पगार यांच्यासह ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंगळवारी (ता. २९) देवीची पंचामृत महापूजा देणगीदार भाविक किसन बल्लाळ यांच्या हस्ते झाली. आदिमायेस पौर्णिमेनिमित्त हिरव्या रंगाचे महावस्त्र नेसवून सोन्याचा मुकुट, मंगळसूत्र, मयूर हार, वज्रटिक, गुलाब हार, कंबरपट्टा, तोडे, कर्णफुले, पाऊले असे सोन्याचे दागिने परिधान करून साजशृंगार करण्यात आला होता.
हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी
सोन्याचे दागिने परिधान करून साजशृंगार
दरम्यान, ३१ डिसेंबरला दर वर्षीप्रमाणे नूतन वर्षनिमित्ताने भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता विश्वस्त संस्थेने श्री भगवती मंदिर भाविकांना २४ तास दर्शनासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर बंद असलेले महाप्रसादालय, भक्तनिवास, भक्तागंण सभागृह, राजराजेश्वरी सभागृह, चिंतन हॉल आदी ठिकाणे आदिमायेच्या भाविकांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक कार्यासाठी अल्प देणगी दरात ट्रस्टच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप