esakal | मोठा दिलासा! येवलेकरांना शुक्रवारी पहाटेच मिळाली गोड बातमी 
sakal

बोलून बातमी शोधा

yeola 1.jpg

गुरुवारी व शुक्रवारी येथील 65 संशयितांपैकी तब्बल 64 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आल्याने येवलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे संपर्क साखळी तुटली असल्याने नव्याने रुग्ण वाढण्याची शक्‍यता घटली आहे, तर शासनाच्या नव्या सूचनांनुसार पॉझिटिव्ह असूनही लक्षणे आढळून न आल्याने येथील 18 रुग्ण निगेटिव्ह अहवाल येण्यापूर्वीच घरी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता उपचार घेऊन घरी सोडलेल्यांची संख्या 24 झाली आहे. 

मोठा दिलासा! येवलेकरांना शुक्रवारी पहाटेच मिळाली गोड बातमी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक/ येवला : गुरुवारी व शुक्रवारी येथील 65 संशयितांपैकी तब्बल 64 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आल्याने येवलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे संपर्क साखळी तुटली असल्याने नव्याने रुग्ण वाढण्याची शक्‍यता घटली आहे, तर शासनाच्या नव्या सूचनांनुसार पॉझिटिव्ह असूनही लक्षणे आढळून न आल्याने येथील 18 रुग्ण निगेटिव्ह अहवाल येण्यापूर्वीच घरी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता उपचार घेऊन घरी सोडलेल्यांची संख्या 24 झाली आहे. 

लक्षणे नसल्याने 18 जणांना अहवालापूर्वीच सोडले घरी 

गुरुवारी सकाळी दहापैकी पुन्हा एकजण पॉझिटिव्ह आला असून, संख्या 32 झाली, मात्र इतर नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने सुस्कारा सोडला. यात सावरगाव येथील सहा, तर आडगाव चोथवा येथील तिघांचा समावेश आहे. नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या गावांनीही सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. सावरगावजवळील मदारी वस्तीवरील एकाच अहवाल शुक्रवारी (ता. 15) पॉझिटिव्ह आला. सावरगाव येथे शुक्रवारी त्या नऊ जणांचे स्वागत शिवसेना नेते संभाजी पवार, पोलिस निरीक्षक अनिल भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, डॉ. वैद्य, गटविकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख, ग्रामविकास अधिकारी रवींद्र शेलार, विशाल काटे, संतोष घोडेराव, सीमा घोडेराव आदी उपस्थित होते. 

शुक्रवारी पहाटे गोड बातमी 
मंगळवारी घेतलेल्या 55 जणांच्या स्वॅबच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथील एका बॅंकेचे 14 कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व पाटोदा येथील संपर्कातील 17 जण यात होते. शुक्रवारी पहाटे एकाच वेळी या सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची बातमी शहरात समजली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात अहवाल निगेटिव्ह आल्याने येथील संपर्क साखळी तुटण्यास मदत झाली आहे. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांनी गोड जेवण दिल्यानंतर त्यांची बाभूळगावहून घरी सुटका झाली. मात्र ते घरी क्वारंटाइन राहतील. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक चित्र! माऊलीच्या पायाला जखमा.. पोळले तळवे.. पण बाळाला दारिद्रयाचे चटके नको!

नियम बदलले, पहिली बाधित महिला घरी 
आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरा होऊन त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत घरी सोडले जात नव्हते. पण नव्या गाइडलाइननुसार लक्षणे नसल्यावर दहा दिवसांत अहवाल न घेता घरी सोडले जाणार आहे. त्यानुसार येथील 18 जणांना घरी सोडले आहे, तर नाशिकहून सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आता 24 जण घरी सोडले आहेत. यापुढे लक्षणे आढळल्याशिवाय संशयितांचे स्वॅबदेखील घेतले जाणार नाहीत. 24 एप्रिलला आढळलेली पहिली बाधित महिलादेखील उपचार घेऊन गुरुवारी नाशिकहून घरी पोचल्याने तिचेही नागरिकांनी स्वागत केले.  

हेही वाचा > मालेगावच्या रुग्णाचा व्हॉटसऍपने लागला शोध.. समजले तेव्हा कुटुंबियांना धक्का!