video : 'रेशनचा काळाबाजार थांबवा!' म्हणत महसूल आयुक्तालयासमोरच आम आदमी पार्टीचे आंदोलन

 app.jpg
app.jpg

नाशिक रोड : निफाड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील प्रश्न न सुटल्यामुळे निफाड येथील आम आदमी पक्ष कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर बुधवारी (ता. 11) रोजी आंदोलन केले. यावेळी महसूल आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आम आदमी पक्षाचे उपोषण स्थगित करण्यात आले.

विविध मागण्यांसाठी आंदोलन

तालुक्यातील अवैध गौण खनिज उपसा करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर रेशन दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात काळाबाजार करणाऱ्यांचे कायदेशीर लेखी ऑडिट करण्यात यावे, अधिकारी मुख्यालयी न राहता सरकारी भत्ते घेतात, अशा अधिकाऱ्यांना मुख्यालय राहायला सांगावे. निफाड तहसील कार्यालयातील दोन वर्षापासून प्रलंबित पडलेल्या वहिवाट केसेस निकाली काढण्यात यावेत. अधिकार्‍यांच्या मर्जीने सुरू असलेली अवैध दारूचे धंदे थांबवून त्वरित कारवाई करण्यात यावी. निफाड नगरपंचायत इतर प्रशासकीय इमारतीत सुरू असलेले वाईन शॉप बियर बार परत बंद करण्यात यावे, या व अशा इतर मागण्यांसाठी निफाड आम आदमी पक्षाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या बाहेर उपोषण व आंदोलन करण्यात आले. 

यावेळी नायब तहसीलदार राजेश आहिरे व तहसीलदार महेश चौधरी यांनी निफाड येथील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून दिल्याने आंदोलन व उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी आम आदमी पक्षाचे निफाड शहराध्यक्ष सागर खताळे, तालुकाध्यक्ष सुरेश देवकर, नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष उत्तमराव निरभवणे, बंडूनाना डांगे, गिरीश उगले पाटील, प्रभाकर वायचळे, शुभम पडवळ अनिल कोकणे दीपक सरोदे भिमराज साळुंखे प्रमोद निरभवणे अनिल कौशिक चंद्रशेखर महानुभाव विजय जगताप यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार चालणे हे दुर्दैवी असून हा काळाबाजार रोखला गेला नाही तर आम्ही पालकमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन व उपोषण करणार आहोत. - ॲड. प्रभाकर वायचळे (सचिव आप)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com