गैरहजर फिजिशियन महापालिकेच्या रडारवर, गुन्हे दाखल करण्याचे आदेश

corona medical team.jpg
corona medical team.jpg

नाशिक : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागात फिजिशियनसह परिचारिका, मिश्रक, प्रयोगशाळातज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ अशा ८४९ पदांची जंबो भरती सुरू असताना तातडीने फिजिशियनची गरज भासत आहे. परंतु नियुक्तीपत्रे देऊनही फिजिशियन हजर होत नसल्याने अखेर गुन्हे दाखल करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे. 

गैरहजर फिजिशियन महापालिकेच्या रडारवर,

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. सोमवारी (ता. १०) तेरा हजारी पार गेलेला आकडा ऑगस्टअखेर वीस हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. जुलैत सर्वाधिक प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकप्रतिनिधींनीही वैद्यकीय विभागातील रिक्त पदे, तसेच गरज वाटल्यास अतिरिक्त पदे भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वैद्यकीय विभागात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, समुपदेशक अशा तब्बल ८४९ पदांसाठी जंबो भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली.

गुन्हे दाखल करण्याचे आदेश

यात सर्वाधिक अडीचशे पदे स्टाफ नर्सची, तर बीएएमएस म्हणजेच आयुर्वेद पदवीधारकांसाठी शंभर जागांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले. त्याचप्रमाणे मल्टिस्किल हेल्थ वर्करचीही शंभर पदे, एमबीबीएस ५० जागा व फिजिशियन दहा, भूलतज्ज्ञ दहा, मानसोपचारतज्ज्ञ ३०, रेडिओलॉजिस्ट अशा अत्यावश्यक पदांसाठी मुलाखतप्रक्रिया राबविण्यात आली. सध्या तातडीने फिजिशियनची गरज आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दोन फिजिशियन रुजू झाले; परंतु नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात फिजिशियनची कमतरता भासू लागल्याने ज्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली त्यांनी रुजू होण्यास नकार दिल्यास गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापालिकेने फिजिशियन, भूलतज्ज्ञांसाठी ७५ हजार रुपये मानधन निश्‍चित केले होते. परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने मानधन दुप्पट करण्यात आले. महापालिकेने ८४९ पैकी ७०८ जणांना विविध पदांसाठी नियुक्तीपत्रे दिली आहेत. 

रुग्णालयांची अशीही दुकानदारी 
कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारून आर्थिक लूट करण्याचे प्रकार घडत असताना आता डॉक्टरांची पळवापळवी होत असल्याचे समोर येत आहे. एमडी, एमबीबीएस पदवीप्राप्त केलेल्या डॉक्टरांना मोठ्या रुग्णालयात नियुक्ती देताना रुग्ण आणल्यास त्यावर टक्केवारीही मिळत असल्याचा नवा प्रकार समोर येत आहे. रुग्ण आणल्यानंतर डॉक्टरांना मिळणारे कमिशन रुग्णांच्या माथी मारण्याचे उद्योग सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.  

 संपादन - मनीष कुलकर्णी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com