VIDEO : दुर्दैवी घटना..परप्रांतिय मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी..प्रत्येकी ४ हजार घेतल्याची बाब उघड

सकाळ वृत्तसेवा  
Thursday, 14 May 2020

स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून सदर कामगारांना संपर्क साधला असता सदर टेम्पो मालकांनी या परप्रांतीय कामगारांकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेतले होते. असे 53 कामगारांचे साधारण दोन लाख रुपये भाडे घेतल्याचे समजते. परंतु टेम्पो पलटी झाल्यानंतर ड्रायव्हर पसार झाला

नाशिक / सर्वतीर्थ टाकेद : घोटी सिन्नर हायवेवर गुरुवार ता.14 सकाळी 6:00 वा भिवंडी कडून ओरिसा येथे 53 प्रवाशांना घेऊन जाणारा आयशर टेम्पो क्र.MH-20 EG-7950 घोटी सिन्नर हायवेवर कॉलनी फाटा जवळ पलटी झाला. त्यात तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते इतर प्रवाशांना नाशिक येथे हलविण्यात आले.

कामगारांकडून प्रत्येकी चार हजार रुपये

 स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून सदर कामगारांना संपर्क साधला असता सदर टेम्पो मालकांनी या परप्रांतीय कामगारांकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेतले होते असे 53 कामगारांचे साधारण दोन लाख रुपये भाडे घेतल्याचे समजते परंतु टेम्पो पलटी झाल्यानंतर ड्रायव्हर पसार झाला असून त्याबरोबर असलेल्या किन्नरही पसार होण्याच्या मार्गावर होता परंतु या प्रवासी कामगारांनी सदर किन्नरला पकडले व सोबती किन्नरकडून दीड लाख रुपये या कामगारांना परत केले परंतु पन्नास हजार रुपयांचा प्रश्न सदर कामगारांना विचारला असता तिकडून ज्या एजंटने सदर टेम्पो भरून दिला. त्याने ते कमिशनपोटी 50 हजार रुपये ठेवून घेतल्याचे समजते.

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: झाड, बाहेरील आणि निसर्ग

बराच वेळ मदत नाही

ही घटना सकाळी सहा वाजता घडल्यानंतर साधारण नऊ वाजेपर्यंत कुठलीही शासकीय यंत्रणा त्यांना मदतीसाठी उपस्थित झाली नसल्याची खंत या कामगारांनी व्यक्त केली, पिंपळगांव डुकरेचे सरपंच भगवान वाकचौरे यांनी माणुसकीचा धर्म पाळत सदर कामगारांना चहा व बिस्किट ची व्यवस्था केली त्यांनीदेखील वाडीवर्हे पोलीस स्टेशनशी संपर्क केला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Ghoti-Sinnar Highway nashik marathi news