PHOTOS : थरारक! शिर्डी बसमध्ये जवळपास ४० प्रवासी...अचानक जोरदार धडक अन् बस पलटी..

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी अन्सारी ट्रॅव्हलच्या लक्‍झरीने (एमएच 04, जीयू 2177) हायवा ट्रक (एमएच 17, बीवाय 1172) व कारला (एमएच 17, बीव्ही 4595) जोरदार धडक दिली व बस उलटली

नाशिक : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर मीरगाव फाट्यावर आराम बसने हायवा ट्रक व कारला जोरदार धडक दिली. या अपघातात 30 ते 35 गंभीर जखमी झाले. 

Image may contain: car, sky and outdoor

अशी घडली घटना...

मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी अन्सारी ट्रॅव्हलच्या लक्‍झरीने (एमएच 04, जीयू 2177) हायवा ट्रक (एमएच 17, बीवाय 1172) व कारला (एमएच 17, बीव्ही 4595) जोरदार धडक दिली व बस उलटली. अपघाताचा आवाज ऐकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, हवालदार प्रकाश गवळी, नितीन जगताप, डी. जी. मोरे, संदीप शिंदे, क्रेनचालक किरण पाटील, इक्‍बाल अत्तार यांनी घटनास्थळी नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले व सिन्नर येथील डॉ. धनराज सोनार यांच्या दवाखान्यात हलविले.

Image may contain: outdoor

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

जखमींवर प्रथमोपचार

काही जखमींवर प्रथमोपचार करून नाशिकला हलविण्यात आले. अपघातानंतर दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. अपघातात तिन्ही वाहनांतील 30 ते 35 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली. वावी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

Image may contain: outdoor

हेही वाचा > तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident of Mumbai-Shirdi Bus injured travelers Nashik Marathi News