PHOTOS : बहिण-भावाची भेट होण्यापूर्वीच मोठा आक्रोश... ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

अंबादास बेनुसकर : सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

मिथुन पवार मिरा भाईंदर मुंबई येथे अग्निशमन दलात फायरमन आहे त्याला आई,वडिल,तीन भाऊ, एक बहीण, पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. बुधवारी (ता.5) सायंकाळी मिथुन हा आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी हारपाडा या आपल्या गावी आला. गुरुवारी सकाळी हारपाड्याहुन मिथुन बहिण शितल चौरेला भेटण्यासाठी निघाला असता अचानक...

नाशिक : मिथुन पवार मिरा भाईंदर मुंबई येथे अग्निशमन दलात फायरमन आहे त्याला आई,वडिल,तीन भाऊ, एक बहीण, पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. बुधवारी (ता.5) सायंकाळी मिथुन हा आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी हारपाडा या आपल्या गावी आला. गुरुवारी सकाळी हारपाड्याहुन मिथुन बहिण शितल चौरेला भेटण्यासाठी निघाला असता अचानक...

असा आला काळाचा घाला

पानखेडा ता.साक्री,येथील चिंचपाडा फाट्याजवळ गुरुवारी (ता.६) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास पिंपळनेर कडुन गुजरात राज्यात सागवान लाकुड घेऊन जाणारी आयसर जीजे.19 एक्स 8383 व हारपाडा (ता. साक्री) येथुन पिंपळनेरकडे जाणारी स्कुटी एम.एच.48बीबी.1857 ला वळणावर आयसरने जोरदार धडक दिल्याने स्कुटी चालक मिथुन बाळू पवार (वय 31) हा जागीच ठार झाला.तर आयसर चालक राजेंद्र अमृत पाटील (वय 21)रा.धारमालपूर,अमळनेर)याचे दोन्ही हात, पाय फॅक्चर तर सहचालक विजय मोहन राठोड (वय 25) रा. जोरवा(बळसाणे) गुजरात हा गंभीर जखमी  असल्याने धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. 
Image may contain: one or more people, sky and outdoor

 बहिणीची भेट होण्याआधीच..

मयत मिथुन बाळू पवार (कळवा ता. पालघर) येथे वास्तव्यास असून मिरा भाईंदर मुंबई येथे अग्निशमन दलात फायरमन आहे त्याला आई,वडिल,तीन भाऊ, एक बहीण, पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. बुधवारी (ता.5) सायंकाळी मिथुन हा आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी हारपाडा या आपल्या गावी आला. गुरुवारी सकाळी हारपाड्याहुन मिथुन बहिण शितल चौरेला भेटण्यासाठी पिंपळनेर येथे येत असतांना काळाने बहिणीची भेट होण्याआधीच काळाने असा घात केला.

Image may contain: shoes and outdoor

दुध विक्रेत्यांने भावाला दिली अपघाताची माहिती

अपघातात दोन्ही वाहनांसह मयताचे तुकडे तुकडे झाले. हारपाडा येथील दुध विक्रेत्यांने मयताचा भाऊ अनिल पवार यांना अपघाताची माहिती दिली असता घटनास्थळी मयताचे नातेवाईक पोहोचले. तेथे मिथुनचे प्रेत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले. बर्‍याच वेळाने अनिल बाळू पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली. घटनास्थळी पोलीस पोहचले. यानंतर पंचनामा करून प्रेत पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Image may contain: car and outdoor

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

सारा गाव दुःखाच्या छायेत

(ता.६) दुपारी  मिथुनचे शवविच्छेदन करुन पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले अत्यंत शोकाकुल वातावरणात मिथुन पवारवर  अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सारा गाव दुःखाच्या छायेत एकवटला. पुढील तपास पोहेकाॅ.युवराज पवार करीत आहेत.

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident with truck and scooty near pankheda Nashik Marathi News