esakal | वारस नोंदीसाठी मागितली लाच; तलाठी गेला बाराच्या भावात! एसीबीची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (71).jpg

वारस नोंदीसाठी लाच मागितल्या प्रकरणी तलाठ्याला चांगलेच महागात पडल्याचा प्रकार घडला आहे. 

वारस नोंदीसाठी मागितली लाच; तलाठी गेला बाराच्या भावात! एसीबीची कारवाई

sakal_logo
By
वाल्मिक शिरसाट

पांढुर्ली (जि.नाशिक) : वारस नोंदीसाठी लाच मागितल्या प्रकरणी तलाठ्याला चांगलेच महागात पडल्याचा प्रकार घडला आहे. 

वारस नोंदीसाठी मागितली रक्कम

याबाबत माहिती अशी, की शिवडे येथील तक्रारदाराच्या आजोबांचे निधन झाले असून, त्यांचे वारस म्हणून तक्रारदाराची आई व मामाच्या नावांची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी तलाठी हरीश लासमन्ना ऐटवार यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली. सोमवारी (ता. २२) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला. तलाठी ऐटवार याने दोन हजार रुपयांची तडजोड करून एक हजार ५०० रुपयांची रक्कम पंच व साक्षीदाऱ्यांच्या समक्ष सिन्नर येथील संगमनेर नाक्यावरील लकी टी स्टॉलजवळ स्वीकारताना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.  

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रचला सापळा

सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावण्यासाठी एक हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना शिवडे (ता. सिन्नर) येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ