प्रताप दिघावकर 'इन ॲक्शन मोड'; एक कॉन्स्टेबलला एक गुन्हेगार दत्तक! पाहा व्हिडिओ

विनोद बेदरकर
Wednesday, 9 September 2020

मी जनतेचा सेवक असून पोलीस शिपायापासून तर सर्वसामान्य व्यक्तीकरिता माझ्या दालनाचे दरवाजे कार्यालयीन वेळेत खुले राहणार आहेत. तसेच माझ्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर ९७७३१४९९९९ कोणी कधीही कायदा सुव्यवस्थेसंदर्भात थेट संपर्क साधू शकतो, असेही ते म्हणाले.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे फसवणुकीचे प्रकार जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल घेऊन त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना 8 दिवसाची मुदत देऊन पैसे दिले तर ठीक अन्यथा त्वरित कारवाई केली जाईल. त्यासाठी कुणीही शेतकरी मला थेट मोबाईलवर संपर्क साधू शकतो असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी बुधवारी (ता. 9) रोजी पत्रकार परिषदेत केले.

मला भेटण्यासाठी 'अपॉईन्टमेंट'ची गरज नाही

यापुढे नाशिक परिक्षेत्रात बळीराजाची आर्थिक फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, लबाडी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या तत्काळ बांधल्या जातील या शब्दांत नाशिकच्या बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र असलेले नवनिर्वाचित विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी कडक इशारा दिला. मला भेटण्यासाठी 'अपॉईन्टमेंट'ची गरज नाही, मी जनतेचा सेवक असून पोलीस शिपायापासून तर सर्वसामान्य व्यक्तीकरिता माझ्या दालनाचे दरवाजे कार्यालयीन वेळेत खुले राहणार आहेत. तसेच माझ्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर ९७७३१४९९९९ कोणी कधीही कायदा सुव्यवस्थेसंदर्भात थेट संपर्क साधू शकतो, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

नाशिक परिक्षेत्रातील लोक सुज्ञ अन् शांतताप्रिय 

मुळ नाशिकचा असल्यामुळे मला नाशिकसह आजुबाजुच्या जिल्ह्यांबद्दल सखोल माहिती आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये कायदासुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माझे पोलीस दल सदैव प्रयत्नशील राहणार आहे. कोरोनाच्या संकटात नाशिक जिल्ह्यासह परिक्षेत्रातील अन्य जिल्ह्यांतसुध्दा रमजान ईद, बकरी ईद, गणेशोत्सव यासह विविध जयंतीउत्सव शांततेत पार पडले आहे. जनता तशी सुज्ञ व कायद्याचे पालन करणारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी व मदतीसाठी आपला वैयक्तिक मोबाईल नंबर देणारे हे नाशिक परिक्षेत्रातील पहिलेच विशेष महानिरिक्षक असावे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action will be taken against those who cheat farmers, Pratap Dighavkar's warning nashik marathi news