आदिवासी विकास भवन चार दिवस बंद; बाराहून अधिक जण कोरोनाग्रस्त

महेंद्र महाजन
Friday, 9 October 2020

राज्यातील आदिवासींच्या विकासाचा कारभार चालणाऱ्या येथील आदिवासी विकास भवनात कार्यरत अधिकारी-कर्मचारी असे बाराहून अधिक जण कोरोनाग्रस्त झालेत. त्यामुळे गुरुवारपासून भवन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : राज्यातील आदिवासींच्या विकासाचा कारभार चालणाऱ्या येथील आदिवासी विकास भवनात कार्यरत अधिकारी-कर्मचारी असे बाराहून अधिक जण कोरोनाग्रस्त झालेत. त्यामुळे गुरुवार (ता. ८)पासून भवन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दुपारनंतर भवनात सॅनिटायझेशन करण्यात आले. 

कोरोना विषाणू संसर्ग वाढल्याने भवनात सॅनिटायझेशन 
आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेतर्फे आदिवासी विकास आयुक्त, अपर आयुक्त, प्रकल्पाधिकारी, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त यांना सॅनिटायझेशन करण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी (ता. ९) भवन बंद ठेवण्याबाबतचे पत्र देण्यात आले. कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ‘वर्क फ्रॉर्म होम’ करण्यासाठी सुटी देण्यात यावी. १२ ऑक्टोबरपासून नियमित कार्यालयीन कामकाज सुरू करावे, असे संघटनेच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 
द्वारसभेत माहिती 
संघटनेचे सरचिटणीस संजय जाधव यांनी कार्यालयप्रमुखांना दिलेल्या पत्राची माहिती भवनाच्या द्वारसभेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली. आयुक्तालयातील चौघे आणि त्यांचे कुटुंबीय, अपर आयुक्त कार्यालयातील दोघे, प्रकल्पाधिकारी कार्यालयातील तिघे आणि सहआयुक्त कार्यालयातील तिघे पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती देण्यात आली. या वेळी आदिवासी विकास आणि शबरी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. याही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना घरून कामकाज करणार असल्याची माहिती दिली आणि बहुतांश जणांनी कार्यालय सोडल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.  

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adivasi Vikas Bhavan closed for four days due to corona nashik marathi news