डिप्‍लोमा अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर; यंदा ई-स्‍क्रुटीनीचा पर्याय उपलब्‍ध

Admission process starts for diploma courses from tomorrow
Admission process starts for diploma courses from tomorrow

नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे विविध पदविका अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशासाठीचे वेळापत्रक जारी केले आहे. त्‍यानुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार (ता.१०)पासून सुरू होत असून, इच्‍छुक पात्र विद्यार्थ्यांना २५ ऑगस्‍टपर्यंत अर्ज करता येतील. कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर यंदा ई-स्‍क्रुटीनीचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्‍ध करून दिला आहे. दरम्‍यान, दहावीनंतर पॉलिटेक्निकरिता, तर बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र शाखेत पदविका, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. 

गर्दी टाळण्याच्‍या सूचना

कोरोनाचा प्रादुर्भाव व सद्यःस्थिती लक्षात घेता, सामाजिक अंतर राखण्याची आवश्‍यकता असून, या पार्श्वभूमीवर पदविका प्रवेशासाठी नियुक्‍त केलेल्‍या सुविधा केंद्रांवर विद्यार्थी, पालकांची गर्दी टाळण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. याचाच एक भाग म्‍हणून सक्षम प्राधिकरण, कागदपत्रांच्‍या प्रत्‍यक्ष छाननी प्रक्रियेव्‍यतिरिक्‍त ई-स्‍क्रुटीनीची संकल्‍पना राबविली जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज 

ऑनलाइन अर्ज भरणे व निश्‍चित करण्यासाठी उमेदवार सोयीनुसार छाननीचा पर्याय निवडू शकतील. पहिल्‍या पर्यायात विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून ई-स्‍क्रुटीनीचा पर्याय निवडून संगणकाद्वारे ऑनलाइन अर्ज भरून आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करतील. उमेदवाराचा अर्ज व कागदपत्रे सुविधा केंद्राद्वारे (एफसी) पडताळले व निश्‍चित केले जातील. तर दुसऱ्या पर्यायात उमेदवार मोबाईलवरून अथवा संगणकावरून ऑनलाइन नोंदणी करून प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीचा पर्याय निवडू शकतील. संगणक, मोबाईल उपलब्‍ध नसलेले विद्यार्थी नजीकच्‍या सुविधा केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकतील. अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी सुविधा केंद्राची तारीख व वेळ ठरवून घेतील. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोडची प्रक्रिया निःशुल्क स्‍वरूपात राबविता येईल. 

असे आहे प्रवेशाचे सध्याचे वेळापत्रक 
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज, कागदपत्रांची स्‍कॅनकॉपी अपलोड करणे १० ते २५ ऑगस्‍ट 
(दोन्‍ही पर्यायांपैकी एका माध्यमातून स्‍क्रुटीनी प्रक्रिया पूर्ण करणे) 
प्रारूप गुणवत्तायादी जाहीर करणार २८ ऑगस्‍ट 
गुणवत्ता यादीसंदर्भात तक्रार नोंदविण्याची मुदत २९ ते ३१ ऑगस्‍ट 

संपादन - रोहित कणसे


  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com