अजित पवारांच्या वाढदिवशी झिरवाळांनी लावले जांभळाचे झाड? कारणही तसेच खास

संपत देवगिरे
Monday, 25 January 2021

अनेक दिवसांपासून सुरु असलेले घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम लवकरच पूर्ण होत आहे. अशी माहिती विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिली.

नाशिक : पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण बातमीच अशी आहे की, पूर्व भागात आनंदीआनंद आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेले घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम लवकरच पूर्ण होत आहे. अशी माहिती विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिली.

पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

नरहरी झिरवाळ म्हणाले की, घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या बारा वळणयोजना व मांजरपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेढ पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रोवली होती. त्यांच्यासह तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार, सुनील तटकरे यांच्याकडे जिल्ह्याचे नेते, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, तत्कालीन आमदार उत्तमबाबा भालेराव, दिलीप बनकर यांचेही मोठे श्रेय आहे. सातत्याने पाठपुरावा केल्याने काम बंद पडल्यावर ते पुन्हा सुरू व्हावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ व मी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आले असून हे पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत 

अजित पवारांच्या वाढदिवशी लावले जांभळाचे झाड

स्थानिक शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणे, अजूनही वाया जाणारे पाणी अडविणे, सदर प्रकल्पस्थळी पर्यटन विकास औषधी वनस्पती लागवड व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या परिसरात जांभूळचे प्रसिद्ध झाड होते प्रकल्प सुरू होताच ते पाडावे लागले. मात्र या प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह सुरू होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मी तेथे पुन्हा जांभळाचे झाड लावले. त्याने या परिसरात पुन्हा औषधी झाडे लावत वनराई फुलवण्याचा मनोदय आहे.

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

नुकतेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच मांजरपाडा प्रकल्पला भेट दिली. यावेळी युवकांनी आमदार झिरवाळ यांच्याकडून सर्व प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी यांचेसह बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, भास्कर भगरे, डॉ योगेश गोसावी, श्याम हिरे, राजेंद्र उफाडे, निलेश गटकळ, पंढरीनाथ ढोकरे, अमोल गणोरे, भाऊसाहेब गणोरे, मधुकर फुगट, नारायण पालखेडे, डॉ अनिल सातपुते, डॉ,विजय गटकळ आदीसह त्यांनी नुकताच या भागातील शेतकर-यांच्या भेटी घेतल्या.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Ajit Pawar's birthday, narhari zirwal planted a purple tree nashik marathi news