अलास्काचा ‘सोनचिखल्या’ नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये मुक्कामी! तब्बल नऊ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास

sonchikhlya 1.jpg
sonchikhlya 1.jpg

नाशिक : थंडी उशिरा दाखल झाल्याने नांदूरमध्यमेश्‍वरच्या पक्षी अभयारण्यात ‘पाहुण्यां’ची एंट्री दोन महिने उशिराने झालीय. सोमवारी (ता. २८) सकाळी खाद्याच्या शोधात अलास्कामधून नऊ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करून सोनचिखल्या अभयारण्यात मुक्कामी पोचलाय. सकाळी पर्यटकांना त्याचे दर्शन झाले. गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये आठ ते दहा हजार पक्ष्यांनी दर्शन घडविले. 

‘पाहुण्या’ने कापलेय नऊ हजार ८०० किलोमीटरचे अंतर 
सोनचिखल्या हा पक्षी खाडीकिनारी राहणे पसंत करतो. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दहा सोनचिखल्या पक्षी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पक्षीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘पाहुण्यां’चा मुक्काम आणखी दोन आठवडे असून, त्यानंतर पुढील प्रवास सुरू होईल, असे पक्षीमित्र नीलेश तांडेल यांनी सांगितले. दररोज किमान दोन हजार किलोमीटरचे अंतर हा पक्षी प्रवास करतो. आशिया खंडात मुक्कामाचे त्याचे आवडते ठिकाण म्हणजे खाडीकिनारा आहे. पेंग्विनप्रमाणे नर-मादी यातील फरक कळत नाही. त्याचे खाद्य गोगलगाय, चिंबोरी, कोळंबी, छोटा तरंगणारा जवळा हे आहे. हे खाद्य मुबलक प्रमाणात येथे मिळत असल्याने त्याची मुक्कामाला पसंती मिळाली आहे. नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये गेल्या दोन वर्षांत अनेक नवीन पाहुण्यांनी हजेरी लावली असून, मागील वर्षी पांढऱ्या शेपटीचा गरुड बघण्यासाठी देशभरातून पक्षीमित्र अभयारण्यात आले होते. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

सोनचिखल्याविषयी थोडेसे... 
० इंग्रजीत ‘पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर’ असे नाव असून, मराठीत त्याला सोनचिखल्या अथवा सोनटिटवी म्हणतात. 
० संस्कृतमध्ये स्वर्ण टिट्टम असे म्हटले जाते. 
० पाठीवरील सोनेरी, करडे ठिपके अधिकच खुलून दिसतात. 
० हा पक्षी खूपच कमी प्रमाणात दिसतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com