तळीरामांच्या जीभेचे चोचले पुरवणं पडलं महागात...अन् 'तो' गेला बाराच्या भावात

alcohol supplier.png
alcohol supplier.png

नाशिक : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जिल्हाभर लॉकडाऊन असतानाही, राज्यात बंदी असलेल्या हातभट्टीच्या गावठी दारूला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. राज्यभरात दारू दुकाने बंद असताना राहूरी (विंचूर - दळवी, ता. नाशिक) येथे मद्याची वाहतूक करणाऱ्या चालकास बेड्या ठोकत टाटा सुमोसह सुमारे सव्वा चार लाखांची दारू जप्त केली. सदरची घटनेची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने केली आहे. 

असा आहे प्रकार

संतोष पुंडलिक भागवत (44, रा. राहूरी, पो. विंचुर दळवी, ता. नाशिक) असे संशयित सुमो चालकाचे नाव आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच, अत्यावश्‍यक सेवा वगळता राज्यासह देशभरात सर्व प्रकारची मद्याची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे तळीरामांची चांगली पंचाईत झालेली असताना, हातभट्टीच्या गावठी दारूकडे मद्यपींची पावले वळू लागल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हातभट्टीच्या दारूला सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. दरम्यान, भगूर - पांढुर्ली मार्गावरून मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाचे निरीक्षक आर.एम. फुलझळके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सोमवारी (ता. 6) भगूर - पांढुर्ली रोडवरील रूख्मिनी विश्वमंगल कार्यालयाजवळ नाकाबंदी करीत वाहन तपासणी सुरू केली. त्यावेळी, गावठी दारूने भरलेली टाटा सुमो (एमएच 01 एएच 7411) पथकाने रोखली असता, संशयित चालक संतोष भागवत यास ताब्यात घेतले. पथकाने वाहन तपासणी केली असता, सुमोतील प्लॅस्टीकच्या कॅनमध्ये सुमारे 250 लिटर हातभट्टीची गावठी दारू मिळून आली. पथकाने सुमोसह गावठी दारू असा सुमारे चार लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक तपास दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे करीत आहेत. सदरची कारवाई विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे, उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर आदींच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, एस.एस. रावते, दीपक आव्हाड, लोकेश गायकवाड, वाहन चालक गोकुळ शिंदे यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com