नाशिकमध्ये 'ही' दुकाने बुधवारपासून उघडता येणार..अन् 'ही' राहणार बंद!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

लॉकडाऊन 3.0 अंतर्गत राज्यशासनाने दिशानिर्देश जारी केले होते. त्यात आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवरील अर्थचक्राला गती देण्यासाठी सर्व प्रकारचे दुकान खुले करण्यासंदर्भात प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

नाशिक : लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली दुकाने उद्या (ता.6) पासून उघडता येणार आहेत. अर्थचक्राला गती प्राप्त होण्यासाठी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगसह अन्य नियमावलीचे पालन झाले नाही, तर दिलेल्या सवलती मागे घेतल्या जातील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व कंटेंनमेंट झोन व मालेगाव क्षेत्रामध्ये यापूर्वीप्रमाणे सर्व निर्बंध कायम राहतील.

 नागरीकांनी नियमांचे पालन केले नाही, तर  सवलतही मागे घेणार

 लॉकडाऊन 3.0 अंतर्गत राज्यशासनाने दिशानिर्देश जारी केले होते. त्यात आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवरील अर्थचक्राला गती देण्यासाठी सर्व प्रकारचे दुकान खुले करण्यासंदर्भात प्रशासनाने निर्णय घेतला आहे. नागरीकांनी नियमांचे पालन केले नाही, तर ही सवलतही मागे घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्हाभरातील कंटेनमेंट झोन तसेच मालेगाव महापालिका क्षेत्रात केवळ जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकान मर्यादित वेळेसाठी खुले राहतील. उर्वरित जिल्हाभरात सर्व प्रकारचे दुकान नियमांचे पालन करतांना खुले ठेवता येणार आहेत.
 

सर्व सुचनांचे काटेकोर पालन करत दुकाने उघडणार 

यापूर्वीच्या नियमावलीनुसार एका रांगेत पाचहून अधिक दुकाने असल्यास त्यापैकी केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची दुकानेच सुरू ठेवण्यास परवानगी होती. परंतु शहरातील मेन रोड, महात्मा गांधी मार्ग व अशा प्रमुख बाजारपेठांमध्ये एका रांगेत दुकान असल्याने यासंदर्भात व्यावसायिकांची गैरसोय होत होती. परंतु नियमावलीत बदल करतांना आता व्यावसायिकांना सर्व सुचनांचे काटेकोर पालन करत दुकाने खुले करता येणार आहे.

शेती संबंधित दुकाने पूर्णवेळ खुली
खरीप हंगामासाठी अत्यंत कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे शेती आणि शेतीसंबंधित यंत्रसागुग्री, बि-बियाणे आदी दुकानांसाठी मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे, शेती विषयक विक्री आणि दुरुस्तीचे दुकाने, केंद्रे, यंत्रसामुग्री दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवली जातील, असे श्री.मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. दुकाने जरी पूर्णवेळ उघडी राहणार असली तरी अपवादात्मक परिस्थितीत गरज भासल्यास वेळेबाबतीत बंधन घालतले जातील. शेतीच्या कामासाठी मजूर, शेतीपूरक पुरवठा उद्योगासाठी कामगार, कृषी संबंधी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याद्वारे नियुक्त प्राधिकाऱ्यांनी वितरीत केलेला परवाना पास पोलिस विभागाने ग्राह्य धरावा, असेही मांढरे यांनी सांगितले.

हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा
 

हे राहणार बंद
- मॉल, सूलन, स्पा, तरण तलाव राहाणार बंद
- बससेवा, रेल्वे, रिक्षा प्रवासी वाहतूकी बंदी
- धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी

अशी असेल दुकांनासाठीची वेळ
शासनाच्या निर्देशांनुसार व्यावसायिकांना सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने उघडता येतील. सायंकाळी सातनंतर मात्र वैद्यकीय वगळता अन्य कुठलेही दुकान उघडता येणार नाही. कंटेंनमेंट झोनमधील जीवनावश्‍यक वस्तूंना यापूर्वीच्या दहा ते चारच्या वेळेची अट कायम राहील.

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All kind of shops will be open from tomorrow Nashik Marathi News