अंबासन येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

दिपक खैरनार
Friday, 9 October 2020

शेतकरी विशाल केदा भामरे यांच्या शेतात चारणीला सोडलेल्या तीन वर्षीय गीर गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना घडली. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचा-यांनी पंचनामा केला असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नाशिक : (अंबासन) येथील निमधरा फाट्यानजीक चिप धरणाजवळील युवा शेतकरी विशाल केदा भामरे यांच्या शेतात चारणीला सोडलेल्या तीन वर्षीय गीर गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना घडली. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचा-यांनी पंचनामा केला असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अशी आहे घटना

मोसम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या तळ ठोकून आहे. परिसरातील शेतक-यांची अनेक पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. जनावरांवर हल्ले सुरूच आहेत. चीप धरणानजीक युवा शेतकरी विशाल भामरे यांची शेती आहे. शेतात चारणीसाठी जनावरे सोडली होती. शेतातील मका पिकातून दबा धरून बसलेल्या बिबट्याने गीर गायीच्या तीन वर्षांच्या वासरीवर हल्ला चढवून थेट फरफटत मक्याच्या शेतात ओढून नेले. सकाळी नेहमीप्रमाणे वासरी घराकडे परतली नसल्याने श्री. भामरे यांनी शेतात पाहणी केली असता त्यांना बिबट्याने वासरू ठार केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील कर्मचा-यांना माहिती दिली असता वनविभागाचे कर्मचारी रेणुका आहिरे व राजेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. 

हेही वाचा >  विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

दरम्यान ताहाराबाद रस्त्यावरील शेतकरी अजय पगारे यांच्या गोठ्यातील वासऱ्यावरही बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली. वनकर्मचारी आकाश कोळी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. परिसरात सध्या मका, बाजरी कापणीला वेग आला असून बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने मजूर शेतीशिवारात धजावत नाहीत. यामुळे शेतीची कामे खोळंबल्याचे शेतक-यांकडून बोलले जात आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in ambasan the calf was killed in a leopard attack nashik marathi news