अराजकीय तरूणांच्या प्रयत्नांना यश अन् ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध!

ambasan gram panchayat 1.jpg
ambasan gram panchayat 1.jpg

अंबासन (जि.नाशिक) : व्हॉट्सअप ग्रुपवरील अराजकीय तरूणांच्या चर्चेला यश आले अन् ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यातील बिनविरोध झालेल्या सात ग्रामपंचायतीपैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच बिनविरोध झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. 

सर्वात मोठी ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच बिनविरोध
प्रशासनाने निवडणुका जाहीर करताच अनेक हौसे नवसे रिंगणात उतरत आपले नशीब अजमावत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील सात गावांमधील ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने प्रशासनाचा ताण काहीसा हलका झाला आहे. मात्र तालुक्यातील बहुतेक उमेदवारांचे कागदपत्राची कमतरतेची उणीव असल्याने बहुतेक उमेदवारांचा हिरमोड झाला. अंबासन येथील अराजकीय तरूणांच्या मध्यस्थीने ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच बिनविरोध झाली. व्हाटसप ग्रुपवरील 'सुजाण पाईक अंबासनकर' यावर ग्रामपंचायत निवडणुका लागताच अनेक साधक बाधक चर्चा सुरू होत्या.

जिल्ह्यात चर्चेचा विषय

बाहेर गावी नोकरीच्या निमित्ताने असलेल्या अराजकीय तरूणांनी गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत बिनविरोध होणे गरजेचे आहे. अशा प्रकारची प्रस्तावना केली असता अनेकांनी पारदर्शकता दाखवली. बिनविरोध निवड व्हावी मात्र उमेदवारांनी एकच लक्ष केंद्रित केले पाहिजे ते म्हणजे गावाचा विकास या मुद्यांवर चर्चा होऊन सर्वानुमते राममंदिर परिसरात बैठक झाली. बैठकीत स्वखुशीने उमेदवारांनी माघार घेऊन समोरील उमेदवारांना पाठिंबा देत संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध करून जिल्ह्यात आदर्श घडवून दिला.  

(वार्ड क्र.१ ) शरद जिभाऊ कोर,

                  पुजा महेंद्र बोरसे 

(वार्ड क्र.२) रंजना सुरेश आहिरे,

                शैलेंद्र निंबाजी कोर,

                शशिकांत रामचंद्र कोर 

(वार्ड क्र.३) मंगलबाई दादाजी कोर,

                स्वाती दादाजी आहिरे,

               भाऊसाहेब नामदेव भामरे 

(वार्ड क्र.४) राजसबाई प्रल्हाद गरूड, 

                भिमाबाई साहेबराव भामरे,

               विजय जगन्नाथ गरूड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com