संशोधकांना सुखद धक्का! काळाराम मंदिरासमोर खोदकामात 'हे' काय आढळले?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

दीड वर्षापासून प्रसिद्ध काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजासमोर विकासकामे सुरू आहेत. खोदकाम करताना पुरातन असलेला हा ठेवा नव्याने बाहेर आला आहे. या ठिकाणी खोदकामात एक पुरातन गोष्ट सापडल्याने या कामाला काहीसा "ब्रेक' लागला. यानंतर...

नाशिक / म्हसरूळ : दीड वर्षापासून प्रसिद्ध काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजासमोर विकासकामे सुरू आहेत. खोदकाम करताना पुरातन असलेला हा ठेवा नव्याने बाहेर आला आहे. या ठिकाणी खोदकामात एक पुरातन गोष्ट सापडल्याने या कामाला काहीसा "ब्रेक' लागला. यानंतर...

खोदकाम करताना हे सापडले....

राज्य शासनाच्या पर्यटन विकास खात्यांतर्गत दीड वर्षापूर्वीपासून येथील काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजासमोर विकासकामे सुरू आहेत. काळानुरूप जसजसे बदल होत गेले तसे मंदिराच्या मूळ पायऱ्या जमिनीत लुप्त होत गेल्या. येथील खोदकाम करताना यात पुरातन बांधकाम असलेली भिंत आढळली. खोदकाम करताना पुरातन असलेला हा ठेवा नव्याने बाहेर आला आहे. या पायऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पायरीवरून मंदिर गाभाऱ्यातील प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या वेगवेगळ्या भागांचे स्पष्ट दर्शन होते. पहिल्या पायरीवरून मुखदर्शन सहजरीत्या होते. या पायऱ्या सुमारे 70 च्या दशकात येथील रस्त्यावर भर पडत गेल्याने जमिनीखाली दबल्या गेल्या असल्याचे तत्कालीन जाणकार नागरिकांनी सांगितले. 

Image may contain: outdoor

पुरातन ठेवा जनतेसमोर आणण्याची मागणी
यानंतर या कामास काहीसा "ब्रेक' लागला. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार ऍड. राहुल ढिकले यांनी या कामास चालना देत, बांधकामात बदल करीत नऊ मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जात आहे. यासाठी मंदिरासमोरील श्रीराम उद्यानाचा काही भाग तोडण्यात आला. यात पुन्हा एकदा पुरातन वास्तूचे अवशेष सापडल्याने, या भोवतालचे खोदकाम करून पुरातन ठेवा जनतेसमोर आणण्याची मागणी मंदिराचे विश्‍वस्त धनंजय पुजारी यांनी केली. सध्या अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणासाठी श्रीराम उद्यानाची भिंत पाडण्यात आली आहे. यात पुरातन बांधकाम असलेली भिंत आढळल्याने हा जुना बांधकाम ठेवा जतन करून पुरातत्त्व विभागाने यात लक्ष घालण्याची मागणी मंदिर विश्‍वस्त तसेच संशोधकांनी केली आहे. 

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम

पुरातत्त्व विभागाकडे पत्रव्यवहार

काळाराम मंदिरासमोर खोदकामात सापडलेल्या या भिंतीच्या अवशेषांवरून याठिकाणी कारंजा होता, हे स्पष्ट होत आहे. जुन्या काळी नाशिक शहरात जवळपास 350 कारंजे असल्याचा उल्लेख आहे. या बांधकाम भोवतालचे खोदकाम करून हा ठेवा जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे याविषयी पत्रव्यवहार करणार आहे. -  देवांग जानी, गोदाप्रेमी  

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An ancient wall found in excavation in front of Kalaram temple nashik marathi news