पीएम किसानच्या वसुलीविरोधात आक्रोश! लॉकडाउननंतर बेरोजगारी, त्यात दिवाळीत वसुली

pm kisan yojna.jpg
pm kisan yojna.jpg

सातपूर (नाशिक) : गावात रोजगार नाही म्हणून तरुणांचे तांडे शहरात येतात. वर्षानुवर्षे ठेकेदाराकडे काम करताना वेतनाची चिठ्ठी व भविष्यनिर्वाह निधी मिळतो. वार्षिक प्राप्तिकर विवरण भरतात. पण हेच ‘आयटी रिटर्न’ अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. किसान सन्मान योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्याकडून थेट योजनेच्या पैशांची वसुली सुरू केल्याने कामगार वस्तीत मोठा आक्रोश आहे. 

पीएम किसानच्या वसुलीविरोधात आक्रोश 
ग्रामीण भागात शेती पिकत नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांची बेरोजगार मुले कामासाठी शहराची वाट धरतात. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी ठेकेदारांकडे मिळेल ते काम करतात. औद्योगिक क्षेत्रात काम करताना ठेकेदारी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांनाही कामकाजाचा भाग म्हणून वार्षिक प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागते. त्यात जर कुणी गावकडची जमीन गहाण ठेवून घर घेतले असेल, तर तिकडे गावाकडे गहाण घराचे आणि शहरात घरासाठी काढलेल्या कर्जाचे व्याज भरावे लागते. अशा दुहेरी आटापिटा करणाऱ्या अनेकांवर सध्या मनस्तापाची वेळ आली आहे. कर्जासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (आयटी रिटर्न) भरले. त्यामुळे असे प्राप्तिकर भरणारे केंद्रीय योजनेतून बाद ठरले आहेत. 

लॉकडाउनने रोजगार गेला 
लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून अनेकांचे रोजगार गेले. ज्यांचे रोजगार टिकले, त्यांची पगारकपात झाली. त्यामुळे उत्पन्न घटले, कर्जाचे हप्ते सुरू आहेत. लॉकडाउनमुळे बेरोजगारी आली, आता पैसे फेडायचे कसे? हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला असतानाच, किसान सन्मान योजनेसारख्या सरकारी योजनांचे पैसे परत घेतले जाऊ लागले आहेत. केद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील आयटी रिटर्न भरणाऱ्या शेतकरी कुटुंबाकडून दुहेरी उत्पन्न अटीचा भंग म्हणून अनुदानाची रक्कम परत वसुली सुरू केली आहे. केंद्रीय योजनेतील पैशांची वसुली सुरू झाल्याने अनेक किरकोळ कामगारांच्या कुटुंबावर आर्थिक आरिष्ट आले आहे. 

लॉकडाउननंतर बेरोजगारी, त्यात दिवाळीत वसुली 
माझ्यासारखी हजारो शेतकऱ्यांची मुले पोट भरण्यासाठी शहरात आली. शहरात घरासाठी कर्ज घेतले. आयटी रिटर्न भरतो म्हणून आता किसान सन्मान योजनेचे पैसे कापले जात आहेत. गावाकडे आई-वडिलांना किसान सन्मान योजनामुळे आधार मिळत होता. - अमित घोरपडे (कामगार)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com