esakal | कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोलाचे - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

annabhau sathe.jpg

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून तसेच लोककलेतून सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. 1) रोजी केले. 

कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोलाचे - छगन भुजबळ

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून तसेच लोककलेतून सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. 1) रोजी केले. 

अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अत्यंत मोलाचे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, संजय खैरनार, शंकर मोकळ, भालचंद्र भुजबळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अशा अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात यावे

तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. आण्णाभाऊ साठे यांच हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्यभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ

go to top