शेतकरीविरोधी निर्णय लोकशाहीसाठी धोकादायकच - आमदार खोसकर

गोपाळ शिंदे
Sunday, 27 September 2020

यावर गंभीरपणे चर्चा झाली नाही. शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनात येईल तेव्हा सरकार निर्णय घेणार असेल, तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.

नाशिक : (घोटी) इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथील रविवारी (ता. 26) रोजी व्यायामशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकरीविरोधी निर्णय लोकशाहीसाठी धोकादायक आहे असे म्हटले. शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले.

गंभीरपणे चर्चा नाहीच

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर घाईघाईने कृषी विधेयक मंजूर करून घेतले. यावर विविध राज्यांच्या धोरणांचा अभाव आढळून येत आहे. आजपर्यंत देशभरात जी बिले घाईघाईने मंजूर केली, त्यांचे पुढे काय झाले, हे आपण पाहिले आहे. यावर गंभीरपणे चर्चा झाली नाही. शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनात येईल तेव्हा सरकार निर्णय घेणार असेल, तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथील व्यायामशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन माळी, उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, जिल्हा युवाध्यक्ष स्वप्नील पाटील, कचरू शिंदे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, महिला तालुकाध्यक्ष अनिता घारे, गोपाळ भगत, ज्ञानेश्वर कडू उपस्थित होते. लालू माळी, गंगाराम माळी, तानाजी झाडे, गोरख गव्हाणे, पिंटू माळी, तानाजी माळी आदी उपस्थित होते. युवक अध्यक्ष पंकज माळी यांनी संयोजन केले. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti-farmer decisions dangerous for democracy - MLA Khoskar nashik marathi news